लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : तालुक्यातील बाम्पेवाडा येथे आॅक्टोबर महिन्यात बिबटाला विद्युत प्रवाहाच्या साहाय्याने मारुन त्याला तलावात फुकल्याची घटना घडली होती. तलावात फेकल्याची घटना घडली होती. पंधरा दिवसाच्या शोधमोहिमेनंतर अखेर आज पकडण्यात वनविभागाला यश आले असून अरुण गोविंदराव वलथरे (५१) रा. बाम्पेवाडा असे आरोपीचे नाव असुन वनअधिकारी संपूर्ण घटनेचा तपास करीत आहे.आॅक्टोबर महिन्यात वनविभागाला गुप्त माहिती मिळाली होती. बाम्पेवाडा येथील तलावात एका बिबट्याला मारत टाकण्यात आल्याची या माहितीच्या आधारावर वनविभागाने मासेमाराच्या सहाय्याने तलावातून मृत बिबट्याला काढले. तेव्हा मृत बिबट्याला विद्युत प्रवाहाने मारुन टाकण्यात आल्याचे उघडकीस आले होते.तेव्हापासून वनअधिकारी आरोपीच्या शोधात होते. अखेर काल रात्री वनविभागाने आरोपीला पकडले व पुढील कार्यवाहीसाठी भंडारा येथे आणण्यात आले. यावेळी सहायक वनसंरक्षक पवार, वनक्षेत्राधिकारी बी. डी. कोळी. सहायक वनक्षेत्राधिकारी वाय. एस. तांडेकर, वनरक्षक कोरे, वनरक्षक हटवार, वनरक्षक गिºहेपूंजे व सहकारी उपस्थी होते. वनविभागाला आरोपी शोधण्यास तब्बल पंधरा दिवसाचा कालावधी लागला.अशी झाली होती शिकारआरोपी वलथरे यांची बाम्पेवाडा शिवारात शेती आहे. शेतीवर लागुनच जंगल आहे. त्यामुळे जंगली जनावरे शेतात येऊन धान पिकांचे नुकसान करतात ही नुकसान थांबविण्यासाठी वलथरे यांनी शेतात कुंपनाला विद्युत प्रवाह लावून ठेवला व त्यात हा बिबट येऊन मरण पावला. पहाटे वलथरे शेतात आले तेव्हा त्यांना शेतात बिबट मृतावस्थेत पडलेल्या अवस्थेत दिसला व त्यांनी सदर बिबट्याला सायकलवर मांडून तलावात नेऊन फेकुन दिले, अशी माहिती सहायक वनक्षेत्राधिकारी तांडेकर यांनी दिली.
बिबट शिकारीतील आरोपी वनविभागाच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 22:46 IST
तालुक्यातील बाम्पेवाडा येथे आॅक्टोबर महिन्यात बिबटाला विद्युत प्रवाहाच्या साहाय्याने मारुन त्याला तलावात फुकल्याची घटना घडली होती. तलावात फेकल्याची घटना घडली होती. पंधरा दिवसाच्या शोधमोहिमेनंतर अखेर आज पकडण्यात वनविभागाला यश आले असून अरुण गोविंदराव वलथरे (५१) रा. बाम्पेवाडा असे आरोपीचे नाव असुन वनअधिकारी संपूर्ण घटनेचा तपास करीत आहे.
बिबट शिकारीतील आरोपी वनविभागाच्या ताब्यात
ठळक मुद्देबाम्पेवाडा येथील घटना : १५ दिवसानंतर वनविभागाला यश