जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:40 IST2021-02-05T08:40:07+5:302021-02-05T08:40:07+5:30

भंडारा : जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत जानेवारी महिन्यात घट आली असून सध्या रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.२४ टक्के झाले ...

Corona cure rate is 96% in the district | जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्के

जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्के

भंडारा : जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत जानेवारी महिन्यात घट आली असून सध्या रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.२४ टक्के झाले आहे. ही बाब जिल्ह्यासाठी दिलासादायक आहे. दरम्यान, गुरुवारी २३ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या. तर २० जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत १३ हजार १७९ व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आल्या. त्यापैकी १२ हजार ६८३ व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.२४ टक्के आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३२० रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. जिल्ह्याचा मृत्युदर २.४३ टक्के आहे. गुरुवारी ३८२ व्यक्तींच्या घशातील स्वॅबचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यात भंडारा तालुक्यातील ४, मोहाडी ७, तुमसर २, पवनी २, लाखनी २, साकोली १ आणि लाखांदूर तालुक्यात २ असे २० रुग्ण आढळून आले आहेत. तर २३ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. गुरुवारी कोरोनाने एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा कोरोनामुक्तीसाठी प्रयत्न करीत असून जिल्हा लवकरच ‘कोरोनामुक्त’ होईल अशी अपेक्षा आहे.

१७६ व्यक्ती उपचाराखाली

जिल्ह्यात १७६ कोरोनाबाधित व्यक्तींवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. सुरुवातीच्या काळात उपचाराखाली असलेल्या रुग्णांची संख्या मोठी होती. परंतु जानेवारी महिन्यात उपचाराखाली असणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होत आहे. गत आठवड्यापासून ही संख्या नीचांकी स्तरावर आली आहे. लवकरच जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण राहणार नाही, अशी अपेक्षा आहे.

Web Title: Corona cure rate is 96% in the district