देवरी तालुक्यात अनेक राेड, रस्ते बांधकामाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:37 IST2021-03-23T04:37:52+5:302021-03-23T04:37:52+5:30

देवरी तालुक्यातील अनेक गावांतील रोड व रस्ते बांधकाम या विकासकामांचे भूमिपूजन आ. सहषराम कोरोटे यांच्या हस्ते पार पडले. तालुक्यातील ...

Construction of several roads in Deori taluka started | देवरी तालुक्यात अनेक राेड, रस्ते बांधकामाला सुरुवात

देवरी तालुक्यात अनेक राेड, रस्ते बांधकामाला सुरुवात

देवरी तालुक्यातील अनेक गावांतील रोड व रस्ते बांधकाम या विकासकामांचे भूमिपूजन आ. सहषराम कोरोटे यांच्या हस्ते पार पडले. तालुक्यातील पितांबरटोला ते मासुलकसा या मार्गावर सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन सेरपारचे सरपंच गुणवंता कवास, उपसरपंच व ग्रा.पं. सदस्यांच्या उपस्थितीत पार पडले. कुंभारटोला ते सिरपूरबांध या मार्गावरील रस्त्यांचे डांबरीकरण कामाचे भूमिपूजन तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संदीप भाटिया, तालुका महासचिव बळीराम कोटवार, युवक काँग्रेसचे देवरी, शहराध्यक्ष कुलदीप गुप्ता, भर्रेगावचे सरपंच लखनलाल पंधरे, सिरपूर बांधचे सरपंच नितेश भेंडारकर, उपसरपंच जयेंद्र मेंढे, माजी सरपंच कला सरोटे, प्रल्हाद सलामे व योगेश साखरे यांच्या उपस्थित पार पडले. चिल्हाटी ते ककोडी या मार्गावर सिमेंट व डांबरीकरण रस्त्याचे भूमिपूजन चिल्हाटीचे सरपंच पुष्पकला मडावी, मुरमाडीचे सरपंच रामदेव सोटी, ककोडी सरपंच मीना मडावी, उचेपूरच्या सरपंच सेवंता गहाणे, उपसरपंच रामजी हिरवाणी, उपसरपंच भय्या जांभूळकर, ककोडी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष उत्तम मरकाम, सोनू साखर, डॉ. ब्रिजलाल सोनवाने, मधुकर उकनकर, पोलीस पाटील चंद्रशेखर साखरे, भगत केकती, मनीष मोटघरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

Web Title: Construction of several roads in Deori taluka started