शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

वनरक्षक निलंबित

By admin | Updated: July 5, 2014 00:13 IST

लाखनी वनपरिक्षेत्रातील संरक्षीत वनातील अवैध सागवान वृक्षतोड प्रकरणी...

लाखनी : लाखनी वनपरिक्षेत्रातील संरक्षीत वनातील अवैध सागवान वृक्षतोड प्रकरणी शेतकरी, ठेकेदार याच्यासह नऊ अन्य जणांना अटक करून वन कस्टडी रिमांड देण्यात आली.ही घटना पाच दिवसांपूर्वी उजेडात येताच वनविभागात एकच खळबळ माजली. या घटनेचे गांभीर्य जाणून घेण्यासाठी नागपुहून मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक टेंभुर्णीकर यांच्या संपूर्ण वनविभागाची यंत्रणा कामी लागली व कालच घटनास्थळाची पाहणी केली.मागील महिन्यात रेंगेपार कोठा येथील शेतकऱ्याच्या मालकीचे व गोडसावरी येथील रतिराम हजारे या मालकी जमिनिला लागून कक्ष क्रमांक १०९ व गट क्रमांक ४८५ मधील २७ झाडे तोडण्यात आली. वृक्षाच्या परवानाबाबत वनविभागाच्या सर्वेक्षणात २७ झाडे संरक्षित वनाच्या हद्दीत आहे. हे लक्षात येताच हे प्रकरण उजेडात आले. त्यानंतर स्थानिक अधिकाऱ्यानी घटनास्थळी धाव घेवून संपूर्ण मुद्देमाल जप्त करून गडेगाव डेपो येथे जमा केला. त्यानंतर शेतकरी व ठेकेदार यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. यात दोघानाही ४ दिवसाचा वन कस्टडीरिमांड मिळाला. या कालावधीत तपास कार्यात झाडे कापणारे मजुर कोठा वाहतुक करणारे कोण, या तपासात तिलकचंद रहांगडाले (२६), महादेव राणे (५०), प्रकाश पुराम (४२), महेश पुराम (२२), सुकदेव बघेले (३६) खुर्शीपार, वसुराज तितरमारे, विनोद भंडारी (२५), श्रीकृष्ण मंडकाम (२२) यांना अटक करून सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यातील वसुराज, विनोद, श्रीकृष्ण यांना जमानतीवर सोडून उर्वरित शेतकरी रतिराम हजारे (४५) ठेकेदार राकेश (२५) व अन्य ६ जणांना तपासा सरस व्हावा याकरिता १ दिवसाचा एफसीआर उद्यापर्यंत ठेवण्यात आला. आरोपी ठेकेदाराने वनविभागाच्या रेंगेपार कोठा येथील सागवान वृक्षाची खरेदी केली होती. त्यानुसार वनविभागाने त्याला वृक्षतोड करून वाहतुक करण्याचा परवाना देण्याची कार्यवाही सुरू केली होती. मात्र ठेकेदाराने या झाडासोबत गोडसावरी येथील गट क्रमांक ४८५ मधील २१ झाडाची अवैध कत्तल केली. याबाबत वनविभागाने सर्वेक्षण करून झाडे लावण्यास मज्जाव केला होता, असे सांगितले. मात्र शेतकरी व ठेकेदार यानी चोरी छुपे झाडे कापून त्या झाडाची वाहतूक केली. (शहर प्रतिनिधी)