शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचा निषेध मोर्चा

By admin | Updated: September 6, 2016 00:29 IST

राज्य शासनाने प्रस्तावित केलेला नवीन कायदा प्रोटेक्शन आॅफ इंटरनल सेक्युरिटी अ‍ॅक्ट २०१६ (मापिसा) हा अन्यायकारी, जुल्मी व हुकुमशाही पद्धतीचा आहे.

 ‘मापिसा’ कायद्याचा विरोध : पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची उपस्थितीतुमसर : राज्य शासनाने प्रस्तावित केलेला नवीन कायदा प्रोटेक्शन आॅफ इंटरनल सेक्युरिटी अ‍ॅक्ट २०१६ (मापिसा) हा अन्यायकारी, जुल्मी व हुकुमशाही पद्धतीचा आहे. सर्वसामान्य नागरिकांना भयभीत करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न शासनाने चालविला असून त्या निर्णयाविरोधात तुमसर काँग्रेसचा निषेध मोर्चा शनिवारला तहसील कार्यालयावर धडकला.मापिसा कायद्याअंतर्गत १०० किंवा त्यापेक्षा जास्त जनसमुदाय असलेल्या कार्यक्रमासाठी पोलीस परवानगी घेणे, ज्या ठिकाणी १०० लोकांपेक्षा जास्त लोकांची ये जा आहे त्या ठिकाणी सी.सी.टी.व्ही. लावणे, पोलिसांविरुद्ध टीका न करणे, परवानगीशिवाय कोणत्याही व्यक्तीची झडती घेण्याचे अधिकार पोलिसांना दिले गेले. जनआंदोलनादरम्यान गुन्हे दाखल करणे आदी सर्व बाबींचा समावेश आहे. परिणामी या कायद्याअंतर्गत सर्वसामान्यांवर अन्याय करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न हे संविधान विरोधी आहे. त्यामुळे या निर्णयाविरोधात काँग्रेसने निषेध मोर्चा काढून तहसील कार्यालयावर धडकले. निदर्शने करून मापिया कायदा मागे घ्यावे याकरिता तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी प्रदेश काँग्रेस कमेटीचे सचिव प्रमोद तितीरमारे, महिला जिल्हाध्यक्षा सीमा भुरे, कार्याध्यक्ष मनोहर सिंगनजुडे, तालुका अध्यक्ष शंकर राऊत, शहर अध्यक्ष अमर रगडे, किशोर भवसागर, खेमराज पंचबुद्धे, कुसुम कांबळे, राजेश ठाकुर, निरज गौर, नलिनी डिंकवार, डॉ.मधुकर लांजे, अनिल भांडके, शैलेश पडोळे, विजय गिरीपुंजे, दिलीप चोपकर, आनंद बिसने, भूषण येळणे, समीर कुरैशी, मनोहर बिसने, रमेश पडोळे, योगीता बावनकर, गळीराम बांडेबुचे, रामेश्वर मोटघरे, गुरुदेव पारधी, नागदेव कांबळे, गणेश ठाकुर, अरविंद जोशी, राजेश चोपकर, वेदांता गंगभोज, लता मालाधरे, राजश्री मलेवार, ममता वासनिक, नैनश्री येरणे, प्रतिभा गजभिये, अंकुश बनकर, अजिम पठाण, संजय शरणागत, चैनलाल पटले व काँग्रेस सेलचे पदाधिकारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)