शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जास्त आवाज करणाऱ्या फटाक्यांचा साठा जप्त करा

By admin | Updated: October 22, 2014 23:13 IST

जिल्ह्यातील फटाक्यांच्या ठोक विक्रेत्यांकडून गोडाऊन मधील फटाके तपासावेत. त्यातील सुतळी बाँब, रॉकेट बॉम्ब, सेव्हन शॉट बाँब इत्यादी आवाज करणारे फटाके फोटून त्यांची तिव्रता मोजावी.

भंडारा : जिल्ह्यातील फटाक्यांच्या ठोक विक्रेत्यांकडून गोडाऊन मधील फटाके तपासावेत. त्यातील सुतळी बाँब, रॉकेट बॉम्ब, सेव्हन शॉट बाँब इत्यादी आवाज करणारे फटाके फोटून त्यांची तिव्रता मोजावी. १२५ डेसीबलपेक्षा अधिक आवाज असणाऱ्या संपूर्ण फटाक्यांचा साठा जप्त करावा असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ.माधवी खोडे यांनी दिले.राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या आदेशानुसार फटाक्यांमुळे पर्यावरणाला होणारी हानी व ध्वनीप्रदुषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर समिती गठीत करण्यासाठी बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.हरीत लवादाच्या आदेशानुसार समिती गठीत करण्यात आली असून या समितीमध्ये अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी पोलीस उपअधीक्षक (गृह), महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी, मुख्य विस्फोटक नियंत्रक नागपूर यांचे प्रतिनिधी यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच प्रत्येक उपविभागस्तरावर अशाच समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.या बैठकीला पोलीस अधीक्षक कैलाश कणसे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महाजन, साकोलीचे उपविभागीय अधिकारी दिलीप तलमले, पोलीस उपअधीक्षक (गृह) पी.पी. धरमसी, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, विस्फोटक विभागाचे क्षेत्र अधिकारी राहुल वानखेडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन गोरे, तुमसरचे तहसीलदार सचिन यादव, पोलीस निरीक्षक चव्हाण, जगदाळे, समीर हुंडलेकर, प्रदीप वडीचार उपस्थित होते. यावेळी अवैध व विनापरवाना आयात केलेल्या चीनी बनावटीच्या फटाक्यांचा साठा आढळून आल्यास तात्काळ जप्त करावा. शांतता क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या भागात जसे शाळा, महाविद्यालय, न्यायालय इत्यादी ठिकाणी १२५ डेसीबलपेक्षा अधिक आवाजाची फटाके फोडल्या जाणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.तसेच निवडणुका घोषित झाल्यानंतर निघणाऱ्या मिरवणुकांमध्ये कार्यकर्ते, व्यक्तींमुळे ध्वनी प्रदूषण होणार नाही याची समिती खात्री करेल. (प्रतिनिधी)