शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांनी केली धान कापणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 22:59 IST

जिल्हाधिकारी शेतात धान कापताहेत. सांगुनही कुणाचा विश्वास बसणार नाही. मात्र भंडाराच्या तरुण जिल्हाधिकाऱ्यांनी चक्क हातात विळा घेतला. एका शेतात पोहचले आणि चक्क धानाची कापणी केली. जिल्हाधिकाऱ्यांचे हे शेतकरी रुप पाहून उपस्थित अचंबित झाले.

ठळक मुद्देनिलज शेतशिवार : कृषी विभागाचा पीक कापणी प्रयोग

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हाधिकारी शेतात धान कापताहेत. सांगुनही कुणाचा विश्वास बसणार नाही. मात्र भंडाराच्या तरुण जिल्हाधिकाऱ्यांनी चक्क हातात विळा घेतला. एका शेतात पोहचले आणि चक्क धानाची कापणी केली. जिल्हाधिकाऱ्यांचे हे शेतकरी रुप पाहून उपस्थित अचंबित झाले.जिल्ह्यातील धान शेतीची काय अवस्था आहे, याची पाहणी कृषी विभाग पीक पाहणीच्या प्रयोगातून केली जाते. महसूल मंडळात पीक कापणी प्रयोग केला जातो. दरवर्षी कृषी विभाग पीक कापणी प्रयोग करुन पीकाचा आढावा घेते. मात्र यावर्षी पहिल्यांदाच खुद जिल्हाधिकारी या प्रयोगाला उपस्थित होते. जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांचा ताफा मंगळवारी मोहाडी तालुक्यातील निलज बुज. येथील पारबता अनतराम गाढवे यांच्या शेतात पोहचला. अर्धा एकर शेतात पारबताबाईने धानाची लागवड केली आहे. त्याच शेतात कृषी विभागाचा पीक कापणी प्रयोग सुरु होता. तेथे जिल्हाधिकारी पोहचले हातात विळा घेतला आणी प्रत्यक्ष धानाची कापणी केली. जिल्हाधिकारी धानाची कापणी करताना पाहून उपस्थित अधिकारी आणि शेतकरीही अचंबित झाले. अर्धा एकरातील दहा बाय दहाच्या प्लॉटवरील धान कापणी करुन प्रयोग करण्यात आला. तणसाबरोबर धानाचे वजन प्रथम करण्यात आले. त्यानंतर धानाची काढणी झाली. त्यातून निर्माण झालेले धान जिल्हाधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी, विमा कंपनीचे अधिकारी व शेतकºयांच्या समक्ष मोजण्यात आले. या पीक कापणी प्रयोगात सरासरी हेक्टरी ३६ क्विंटल धान उत्पादन झाले. त्याद्वारे २३ क्विंटल तांदळाचे उत्पादन होईल. असा अंदाज काढण्यात आला. यावेळी कृषी विभागाचे संचालक अरुण बलसाने, तंत्र अधिकारी मनिषा थोटे, तालुका कृषी अधिकारी रामटेके उपस्थित होते.एखाद्या जिल्हाधिकाऱ्याने प्रत्यक्ष शेतात जावून पीक कापणी करण्याचा हा पहिलाच प्रसंग असावा. अधिकारी म्हटले की, सर्वसामान्यापासून फटकून वागणारे असाच समज असतो. पंरतु यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. या प्रयोगाने जिल्हाधिकाऱ्यांचे नविन रुप जिल्ह्याला अनुभवायला मिळाले.३४ मंडळात प्रयोगकृषी विभागाच्या वतीने प्रत्येक महसूल मंडळात १२ पीक कापणी प्रयोग करण्यात येतात. जिल्ह्यात हा प्रयोग ३४ मंडळात सुरु आहे. या प्रयोगातून जिल्ह्याच्या धान उत्पादनाची सरासरी काढण्यात येते. मंगळवारी हा प्रयोग जिल्हाधिकारी शांतनु गोयल यांच्या उपस्थितीत करण्यात आला.