कोका अभयारण्य खुणावते पर्यटकांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 05:00 AM2020-10-21T05:00:00+5:302020-10-21T05:00:32+5:30

कोरोना संसर्गापासून कोका अभयारण्य पर्यटनासाठी बंद करण्यात आले होते. आता दिर्घ कालावधीनंतर १ नोव्हेंबरपासून अभयारण्य पर्यटनासाठी खुल होणार आहे. त्यामुळे पर्यटकांना लवकरच पर्यटनाचा आनंद लुटता येणार आहे. वन्यजीवप्रेमींना लवकरच निसर्गाचे सानिध्य लाभणार आहे. भंडारा शहरापासून १२ किमी अंतरावर असलेल्या या अभयारण्यात फिरण्यासाठी वन विभागतर्फे सफारीची सुविधा आहे.

Coca Sanctuary marks the tourists | कोका अभयारण्य खुणावते पर्यटकांना

कोका अभयारण्य खुणावते पर्यटकांना

googlenewsNext
ठळक मुद्देजंगल सफारी : १ नोव्हेंबरपासून पर्यटनासाठी खुले

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेले कोका वन्यजीव अभयारण्य कोरोना संकटामुळे लॉकडाऊन होते. गत सहा महिन्यांपासून पर्यटकांचा श्वास घरामध्येच कोंडला होता. परंतु आता १ नोव्हेंबरपासून कोका अभयारण्य पर्यटकांसाठी खुले होत असून अभयारण्यातील पशूपक्षांचा आवाज कानी घुमणार आहे. निसर्गप्रेमींना कोका अभयारण्य आता खुणावत आहे.
नवेगाव, नागझीरा व्याघ्र राखीव क्षेत्रांतर्गत विस्तीर्ण अशा १०० किमी क्षेत्रात कोका अभयारण्य आहे. या अभयारण्याची स्थापना १८ जुलै २०१३ मध्ये करण्यात आली. भंडारा शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर कोका वन्यजीव अभयारण्य आहे. या अभयारण्यात सुमारे २०० प्रजातीचे पक्षी, ५० प्रजातीची फुलपाखरे आणि हजार प्रजातीची वनस्पती आहे. वाघ, बिबट, अस्वल, रानकुत्रे, कोल्हे, चांदी अस्वल, रानगव्हे, चितळ, सांभार, काळवीट, रानडुकर, भेकड, चौसिंगा, निलगाय, खवल्या मांजर, उदमांजर, जंगली मांजर, चिचुंद्री, ससे, साळींदर असे वन्यजीव आहेत.
अजनी, राजडोह तलावात बारमाही पाणी असते. त्याठिकाणी व्यन्यप्राणी मोठ्या प्रमाणात येतात. अनेक ठिकाणी नैसर्गिक चाटन व लोटन क्षेत्र आहे. जागोजागी पहाडी क्षेत्र असून त्यात कोदुर्ली पहाड, लाखापाटील पहाड, तीन खंबा पहाड, कालागोटा पहाड, कोलासुरी पहाड, भडकाई पहाड, झरी पहाड, अस्वल पहाड, कोडोपेन पहाड, कुत्राखाई पहाड, बेलमारी पहाड, लाम्हानी पहाड, मोकाशीदेव पहाड, सावधान टेकडी आदी पहाडी आहेत. या घनदाट जंगलात वन्यप्राण्यांचा मुक्त संचार आहे.
मात्र कोरोना संसर्गापासून कोका अभयारण्य पर्यटनासाठी बंद करण्यात आले होते. आता दिर्घ कालावधीनंतर १ नोव्हेंबरपासून अभयारण्य पर्यटनासाठी खुल होणार आहे. त्यामुळे पर्यटकांना लवकरच पर्यटनाचा आनंद लुटता येणार आहे. वन्यजीवप्रेमींना लवकरच निसर्गाचे सानिध्य लाभणार आहे. भंडारा शहरापासून १२ किमी अंतरावर असलेल्या या अभयारण्यात फिरण्यासाठी वन विभागतर्फे सफारीची सुविधा आहे.
निसर्गाचा अगदी जवळून आनंद लुटायचा असेल आणि कोरोना काळात घरी बसुन कंटाळला असाल तर, एकदा कोका अभयारण्याला अवश्य भेट द्यायलाच हवी.

हिरवागर्द परिसर, रानफुलांचे ताटवे
प्रत्येक ऋतु आपल्या परीने सृष्टीला नवे रुप देत असतो. हिरवा गर्द परिसर, रंगीबेरंगी रानफुलांची दुनिया आणि फुलपाखरांची दुनिया पर्यटकांना खुनावत आहे. विशेष बाब म्हणजे या अभयारण्यातील निमखोज दगड, लालचड्डी नाला, सतीचा झरा, हत्तीखोज दगड, आंबेनाला, इंग्रजकालीन जुने रस्ते, जांभुळ झरा, पळस झरा, झिलबुल झरा, दोनतोंड्या नाला, बिराची बोडी, पटाची दान, हिरडी घाट, वासुदेव रस्ता, मामाभाचा तलाव, भावडा मोड, मार्बत नाला, लाखापाटी शिवमंदीर, चिंधादेवी मंदीर, हिरकीपाट, तोंडीया नाला, मार्बतखिंड पर्यटकांना भुरळ घातल्याशिवाय राहत नाही. जंगल वेली, झुडपे, झाडे आपल्या विविध रुपांचे दर्शन घडवीत पक्षीविश्व आणि प्राणी संपदा जवळून अनुभवता येते.

कोका वन्यजीव अभयारण्यात जैवविवितेचे दर्शन घडते. वनऔषधी वृक्ष आणि विविध प्रजातीची उंच झाडे पर्यटकांना आकर्षित केल्याशिवाय राहत नाही. विविध वन्यजीवांचे पर्यटकांना दर्शन होते. वन्यजीव विभागाच्यावतीने पर्यटकांसाठी येथे सुविधा उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
- सचीन जाधव
वनपरिक्षेत्राधिकारी, कोका वन्यजीव अधिकारी

Web Title: Coca Sanctuary marks the tourists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.