मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:25 IST2021-06-05T04:25:35+5:302021-06-05T04:25:35+5:30

रुग्णालयातील पायाभूत सुविधांचा वापर करुन प्रशिक्षण (ऑन जॉब ट्रेनिंग) देण्यात येणार आहे. प्रशिक्षण संस्थांना राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत प्रशिक्षण ...

CM MahaArogya Skill Development Training | मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण

मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण

रुग्णालयातील पायाभूत सुविधांचा वापर करुन प्रशिक्षण (ऑन जॉब ट्रेनिंग) देण्यात येणार आहे. प्रशिक्षण संस्थांना राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत प्रशिक्षण शुल्क देण्यात येईल. या योजनेअंतर्गत राज्यातील सरकारी व खासगी रुग्णालयामध्ये सुमारे २० हजार कुशल मनुष्यबळ तयार करण्याचा उद्देश आहे. त्यापैकी भंडारा जिल्ह्यात सुमारे १५०० युवक युवतींना या माध्यमातून रोजगार उपलब्ध होईल. अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त प्र. ग. हरडे यांनी दिली.

या कोर्सचे प्रशिक्षणात वैद्यकीय तंत्रज्ञ, ड्रेसर, पंचकर्म तंत्रज्ञ, आयुर्वेद डायटिशियन, योगा थेरपी सहायक, मेडिकल रेकॉर्ड सहायक, ड्यूटी मॅनेजर, डायबिटीज असिस्टंट, ट्रान्सप्लांट को-ऑर्डिनेटर, रुग्णवाहिका चालक, ज्येष्ठ नागरिकांसाठी केअर टेकर, वैद्यकीय साहित्य तंत्रज्ञ, योगा वेलनेस ट्रेनर, आयुर्वेद आहार आणि पोषण सहायक, इमर्जन्सी मेडिकल टेक्निशियन यासह ३६ कोर्सेसचा समावेश आहे.

कोट

रुग्णालयांनी सदर योजनेत सहभाग नोंदविल्यानंतर रुग्णालयांची यादी तयार करण्यात येईल. त्यानुसार इच्छुक उमेदवारांकडून गुगल फॉर्मद्वारे अर्ज भरून घेण्यात येतील. आरोग्य क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची कमतरता असून या योजनेमार्फत ती भरून काढण्यात येईल.

प्र. ग. हरडे, सहायक आयुक्त, कौशल्य विकास विभाग, भंडारा.

Web Title: CM MahaArogya Skill Development Training