शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

तुमसरातील ४२ सीसीटीव्ही कॅमेरे बंद

By admin | Updated: September 20, 2016 00:27 IST

शहर सुरक्षित राहुन हालचालीवर लक्ष राहावे, शहरात येणाऱ्या व जाणाऱ्यांची नोंद टिपणारे सीसीटीव्ही कॅमेरे मागील काही दिवसांपासून बंद आहेत.

चोरीच्या घटनांमध्ये वाढ : कंत्राटदारावर कारवाईची शक्यतातुमसर : शहर सुरक्षित राहुन हालचालीवर लक्ष राहावे, शहरात येणाऱ्या व जाणाऱ्यांची नोंद टिपणारे सीसीटीव्ही कॅमेरे मागील काही दिवसांपासून बंद आहेत. शहरात महिनाभरापासून सोनसाखळी चोरट्यांची टोळी सक्रीय आहे. बंद सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे चोरट्यांचे चांगलेच फावत आहे.तुमसर नगर पालिकेने आठ महिन्यापूर्वी लक्षावधी रूपये खर्चून शहरातील मुख्य चौकात, रस्त्यावर ९२ सीसीटीव्ही कॅमेरे लावले. या कॅमेऱ्याची शहराच्या हालचालीवर करडीनजर होती. चोरीच्या घटनेत कमालीची घट झाली होती. चोरट्यांवर आळा बसला होता. पंरतु मागील काही दिवसांपासून हे सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडल्यामुळे याचा फायदा चोरट्यांनी उचलला आहे. महिनाभरात महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या ओढून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. पंरतु चोरटे गजाआड झाले नाही. तुमसर पालिकेने सीसीटीव्ही लावून शहर सुरक्षित केले होते. संबंधित कंत्राटदारावर एक वर्षपर्यंत सीसीटीव्हीचे देखभाल करण्याची जबाबदारी पालिकेने सोपविली होती. कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे सीसीटीव्ही बंद पडले ओहत. यासंदर्भात मुख्याधिकाऱ्यांनी संबंधित कंत्राटदाराला सूचना दिलेली आहे. नियम मोडला तर कारवाई करण्याचे संकेत मुख्याधिकाऱ्यांनी दिले आहे. (तालुका प्रतिनिधी)संबंधित कंत्राटदाराला १८ सप्टेंबर रोजी पत्र देऊन सीसीटीव्ही कॅमेरे पुर्ववत सुरु करण्याचे निर्देश दिले. यासंदर्भात तुमसर पोलिसांना पत्र दिले असून संबंधित कंत्राटदारावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.-चंद्रशेखर गुल्हाणे, मुख्याधिकारी तुमसर