तुमसरातील ४२ सीसीटीव्ही कॅमेरे बंद

By Admin | Updated: September 20, 2016 00:27 IST2016-09-20T00:27:43+5:302016-09-20T00:27:43+5:30

शहर सुरक्षित राहुन हालचालीवर लक्ष राहावे, शहरात येणाऱ्या व जाणाऱ्यांची नोंद टिपणारे सीसीटीव्ही कॅमेरे मागील काही दिवसांपासून बंद आहेत.

Close up to 42 CCTV cameras in you | तुमसरातील ४२ सीसीटीव्ही कॅमेरे बंद

तुमसरातील ४२ सीसीटीव्ही कॅमेरे बंद

चोरीच्या घटनांमध्ये वाढ : कंत्राटदारावर कारवाईची शक्यता
तुमसर : शहर सुरक्षित राहुन हालचालीवर लक्ष राहावे, शहरात येणाऱ्या व जाणाऱ्यांची नोंद टिपणारे सीसीटीव्ही कॅमेरे मागील काही दिवसांपासून बंद आहेत. शहरात महिनाभरापासून सोनसाखळी चोरट्यांची टोळी सक्रीय आहे. बंद सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे चोरट्यांचे चांगलेच फावत आहे.
तुमसर नगर पालिकेने आठ महिन्यापूर्वी लक्षावधी रूपये खर्चून शहरातील मुख्य चौकात, रस्त्यावर ९२ सीसीटीव्ही कॅमेरे लावले. या कॅमेऱ्याची शहराच्या हालचालीवर करडीनजर होती. चोरीच्या घटनेत कमालीची घट झाली होती. चोरट्यांवर आळा बसला होता. पंरतु मागील काही दिवसांपासून हे सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडल्यामुळे याचा फायदा चोरट्यांनी उचलला आहे. महिनाभरात महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या ओढून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. पंरतु चोरटे गजाआड झाले नाही. तुमसर पालिकेने सीसीटीव्ही लावून शहर सुरक्षित केले होते. संबंधित कंत्राटदारावर एक वर्षपर्यंत सीसीटीव्हीचे देखभाल करण्याची जबाबदारी पालिकेने सोपविली होती. कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे सीसीटीव्ही बंद पडले ओहत. यासंदर्भात मुख्याधिकाऱ्यांनी संबंधित कंत्राटदाराला सूचना दिलेली आहे. नियम मोडला तर कारवाई करण्याचे संकेत मुख्याधिकाऱ्यांनी दिले आहे. (तालुका प्रतिनिधी)

संबंधित कंत्राटदाराला १८ सप्टेंबर रोजी पत्र देऊन सीसीटीव्ही कॅमेरे पुर्ववत सुरु करण्याचे निर्देश दिले. यासंदर्भात तुमसर पोलिसांना पत्र दिले असून संबंधित कंत्राटदारावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.
-चंद्रशेखर गुल्हाणे,
मुख्याधिकारी तुमसर

Web Title: Close up to 42 CCTV cameras in you