चिचाळ ग्रामपंचायतीचा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 05:00 AM2020-05-14T05:00:00+5:302020-05-14T05:00:56+5:30

गावातील वाहणाऱ्या नालीच्या सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन होत नसल्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. घाणीने साचलेल्या व तुडुंब भरलेल्या नाल्यांची सफाई करण्याची आवश्यकता आहे. याकरिता ग्रामपंचायत प्रशासनाने ठोस पावले उचलून सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन करावे, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. तसेच घराशेजारी ठिकठिकाणी शेणखताचे ठिगारे असल्यामुळे परीसरात खूप दुर्गंधी पसरली आहे.

Chichal Gram Panchayat's game with the health of the citizens | चिचाळ ग्रामपंचायतीचा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

चिचाळ ग्रामपंचायतीचा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

Next
ठळक मुद्देगावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात : नागरिकांनी केली स्वच्छतेची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
बारव्हा : लाखांदूर पंचायत समिती अंतर्गत येणाºया चिचाळ येथील ग्रामपंचायत प्रशासनाला स्वच्छतेचा विसर पडल्याचे चित्र दिसून येत आहे. सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गावोगावी ग्रामस्वच्छता अभियान राबविले जात आहे. गावागावात जंतुनाशक फवारणी केली जात आहे. तसेच स्वच्छतेबाबत ग्रामपंचायतस्तरावरून जनजागृती करण्यात येत आहे. मात्र चिचाळ गावात अजूनही जंतुनाशक फवारणी करण्यात आली नाही.
गावातील वाहणाऱ्या नालीच्या सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन होत नसल्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. घाणीने साचलेल्या व तुडुंब भरलेल्या नाल्यांची सफाई करण्याची आवश्यकता आहे. याकरिता ग्रामपंचायत प्रशासनाने ठोस पावले उचलून सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन करावे, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. तसेच घराशेजारी ठिकठिकाणी शेणखताचे ठिगारे असल्यामुळे परीसरात खूप दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
कोरोना विषाणूने सारे जग भयभयीत झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छतेबाबतीत जागृकता निर्माण झाली आहे.
यासंदर्भात चिचाळ येथील नागरीक उत्तम नंदेश्वर यांनी स्थानिक प्रशासनाला लेखी निवेदन देऊन घराशेजारी असलेले शेणखताचे ढिगारे हटविण्याची मागणी केली मात्र याकडे स्थानिक प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.
त्यांनी याप्रकरणी तंटामुक्त समिती चिचाळ, संबंधित आरोग्य अधिकारी बारव्हा व खंडविकास अधिकारी यांना सुद्धा लेखी निवेदन देण्यात आले पण अजून पर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. जिल्ह्याचे मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन चौकशी करून कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात सरपंच गिरीष झोडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला.

नालीवर खातकुडे
चिचाळ येथील नागरिक उत्तम नंदेश्वर यांच्या घराशेजारी परिसरातील काही नागरिकांनी सांडपाणी वाहून जाणाºया नालीवर शेणखताचे खातकुडे तयार केले आहेत. त्यामुळे नालीत वाहणारे सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून शेणखताच्या दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या परिसरात डासांचा प्रादूर्भाव वाढल्यामुळे गावकऱ्यांत संसर्गजन्य आजाराची भीती निर्माण झाली आहे. अंगणवाडी सभोवताल काही नागरिक आपली जनावरे बांधत आहेत. जनावरांच्या मलमूत्रामुळे घाण निर्माण झाली आहे. अंगणवाडीत येणाऱ्या चिमुकल्यांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title: Chichal Gram Panchayat's game with the health of the citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.