शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
2
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
3
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
4
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
5
केरळ मुख्यमंत्रिपदाचा वाद काँग्रेसच्या हायकमांडच्या दरबारात, आठवडा उलटला तरी नाव निश्चित नाही
6
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
7
Petrol Diesel Price: जागतिक बाजारपेठेत इंधनाचा भडका! जगातील अनेक देशांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले; भारताची नेमकी स्थिती काय?
8
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
9
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
10
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
11
विशेष लेख: भगव्या बंगालमध्ये सगळ्यांना ‘भाकरी’ मिळेल का?
12
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
13
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
14
अन्वयार्थ: न्यायालय म्हणते, बोगस दिव्यांग ‘काळी मेंढरे’ सेवेतून हाकला !
15
लेख: शहरांनी सुरळीत धावण्यासाठी त्यांच्या पायांना कसली चाकं हवीत?
16
अग्रलेख: युद्धाच्या झळा, काटकसरीच्या कळा
17
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
18
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
19
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
20
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
Daily Top 2Weekly Top 5

प्रवेशद्वारावरच अभ्यागतांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 05:01 IST

जिल्हा मुख्यालय असलेल्या भंडारा शहरात अनेक महत्त्वाची शासकीय व निमशासकीय कार्यालये आहेत. याशिवाय जिल्हा न्यायालय जिल्हा परिषद जिल्हाधिकारी कार्यालयासह बँका, शाळा महाविद्यालय आहेत. मात्र, या सर्वांमध्ये थॅर्मल स्कॅनिंग व सॅनिटायजरची व्यवस्था पाहणीतून दिसून आले.

ठळक मुद्देसावध पवित्रा : शासकीय कार्यालयात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोरोना संसर्गाच्या काळात शासकीय कार्यालयात येणाऱ्या अभ्यागतांसह अधिकारी, कर्मचाऱ्यांची कुठलीच तपासणी होत नसल्याचे वास्तव ‘लोकमत’ ने रिअ‍ॅलिटी चेकच्या माध्यमातून पुढे आणले होते. याच वृत्ताची दखल घेत आता शहरातील बहुतांश शासकीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच अभ्यागतांची तपासणी केली जात आहे. पंंचायत समिती कार्यालयात सॅनिटायजर तर तहसील कार्यालयाच्या प्रवेशव्दारावर एका शिपायाची नियुक्ती केली आहे.
जिल्हा मुख्यालय असलेल्या भंडारा शहरात अनेक महत्त्वाची शासकीय व निमशासकीय कार्यालये आहेत. याशिवाय जिल्हा न्यायालय जिल्हा परिषद जिल्हाधिकारी कार्यालयासह बँका, शाळा महाविद्यालय आहेत. मात्र, या सर्वांमध्ये थॅर्मल स्कॅनिंग व सॅनिटायजरची व्यवस्था पाहणीतून दिसून आले. ‘लोकमत’मध्ये या आशयाचे वृत्त धडकताच तालुका महसूल प्रशासनाने याची दखल घेतली. गत आठवड्यात लोकमत प्रतिनिधीने तहसील कार्यालयासह पंचायत समिती कार्यालय तसेच प्रशासकीय इमारतीमध्ये असलेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालय तथा जिल्हा उद्योग केंद्र व अन्य कार्यालयांची अवस्था जाणून घेतली. मात्र कुठेही थर्मल स्कॅनिंग होत नसल्याची बाब समोर आली होती. फक्त जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर तपासणी होत असल्याचे दिसून आले होते. मात्र अन्य शासकीय कार्यालयात याची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून आले. यावर ‘लोकमत'ने जनजागृती अंतर्गत वृत्त प्रकाशित केले. यासंदर्भात सोमवारी ‘लोकमत’ प्रतिनिधीने शासकीय कार्यालयांचा फेरफटका मारला असता अनेक ठिकाणी सॅनिटायजर व्यवस्था होती. तहसील कार्यालयातही मुख्य प्रवेश द्वारावर शिपायाची नियुक्ती करण्यात आली आहे. पण प्रशासकीय इमारतीत कोणतीच सुविधा कार्यान्वित करण्यात आलेली नव्हती.

जिल्हा न्यायालयात येणाऱ्यांची नोंदणी
येथील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात येणाऱ्या प्रत्येकाची नोंदणी प्रवेशद्वारावर केली जात असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे २२ मार्चनंतर घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळातही याची अंमलबजावणी सुरू होती. स्वच्छता व आरोग्याबाबत जिल्हा न्यायालय प्रशासनाने चांगली काळजी घेतली आहे. न्यायालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची विचारपूस केली जात असल्याचे दिसले. येथे पोलिस कर्मचाऱ्यांचीही निगराणी असते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या