शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
2
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
3
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
6
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
7
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
8
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
9
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
10
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
11
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
12
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
13
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
14
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
15
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
16
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
17
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
18
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
19
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
20
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

विमा कंपनीला चपराक

By admin | Updated: February 27, 2015 00:26 IST

अपघातग्रस्त जीप गाडीच्या मालकला नॅशनल इंशुरन्स कंपनी शाखा भंडारा व नागपूरच्या अधिकाऱ्यांनी विमा दाव्यासह २ लाख ४५ हजार रुपये व्याजासकट परत करावी,

भंडारा : अपघातग्रस्त जीप गाडीच्या मालकला नॅशनल इंशुरन्स कंपनी शाखा भंडारा व नागपूरच्या अधिकाऱ्यांनी विमा दाव्यासह २ लाख ४५ हजार रुपये व्याजासकट परत करावी, असा आदेश येथील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने पारीत केला.सविता किसनलाल फुलसूंगे रा. बाबा मस्तानशहा वॉर्ड, भंडारा यांनी जीप क्र. एम.एच.३६- ०९७७ विकत घेतली होती. या वाहनाचा विमा नॅशनल इंशुरन्स कंपनी शाखा भंडारा येथे काढला. दरम्यान या वाहनाला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील नागपूर जिल्ह्यातील मौदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अपघात झाला होता. अपघातात वाहनाचा चुराडा झाला. भंडारा येथील नॅशनल इंशुरन्स कंपनीने वाहन मालक सविता फुलसूंगे यांना विम्यापोटी ३ लाख ८९ हजार रुपये दिले. इंशुरन्स कंपनीने विमा काढतेवेळी असलेली ६ लक्ष रुपये विम्याच्या किंमतीमधून ३ लाख ८९ हजार रुपये वजा करुन उर्वरित २ लक्ष १० हजार रुपये दिले नाही. उर्वरित विम्याची मागणी करुनही रक्कम मिळाली नाही. रक्कम देण्यास टाळाटाळ होत असल्याचे दिसून येताच सविता फुलसूंगे यांनी ग्राहक मंचकडे धाव घेतली. दोन्ही पक्षांच्या वकीलांचा युक्तीवाद, कागदपत्रांच्या तपासाअंती मंचने नॅशनल इंशुरन्स कंपनी शाखा भंडारा व नागपूरच्या अधिकाऱ्यांनी जीपगाडीच्या शिल्लक असलेल्या भंगारपोटी दोन लाख १० हजार रुपये व्याजासह ३ फेब्रुवारी २०१४ पासून रक्कम देतपर्यत परत करावी, वाहन मालकाला झालेल्या त्रासापोटी २५ हजार रुपये, तक्रारीचा खर्च म्हणून १० हजार रुपये अदा करावी, असा आदेश पारीत केला. याप्रकरणात वाहन मालकाकडून अ‍ॅड. के. एस. भुरे यांनी युक्तीवाद केला. (नगर प्रतिनिधी)