शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

चार पिढ्यांच्या शिक्षणाची साक्ष देतेय शतकोत्तरी इमारत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:25 IST

लाखांदूर तालुक्यातील सोनी येथे १५ सप्टेबर १९३३ रोजी शाळेसाठी कौलारु वास्तू साकारण्यात आली. तत्कालीन कोर्ट ऑफ वाॅर्ड सिनियर ...

लाखांदूर तालुक्यातील सोनी येथे १५ सप्टेबर १९३३ रोजी शाळेसाठी कौलारु वास्तू साकारण्यात आली. तत्कालीन कोर्ट ऑफ वाॅर्ड सिनियर भोसला इस्टेट नागपूर मालगुजारी सोनी यांनी शाळेसाठी जागा दान दिली होती. त्यावेळची या जागेची किंमत ५० रुपये होती. दान दिलेल्या जागेवर प्राथमिक शाळा बांधण्यात आली. त्यावेळी लगतच्या जिल्ह्यांसह गावच्या परिसरातील हजारो विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरविण्यासाठी येत होते. इमारतीच्या भिंतीवर आजही सुविचार, भारतीय संविधानाची प्रास्ताविका, भंडारा जिल्ह्याचा तालुकानिहाय नकाशा, राष्ट्रगीत, राष्ट्रीयगीत, प्रतिज्ञा, भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान यांचा कार्यकाल तथा त्यांच्या नावाची यादी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचा नकाशा, शिष्यवृत्तीधारकधारक विद्यार्थ्यांची यादी यांची फलके रेखाटली आहेत. सध्यातरी या इमारतीच्या भिंती सुस्थितीत असून या भागात वानरांच्या वावराने छतावरील कवेलू दरवर्षी फुटतात. काही प्रमाणात छताचे लाकूड देखील कमकुवत झाले आहे. शाळा प्रशासनातर्फे नियमितपणे शाळेच्या इमारतीची निगा राखली जात आहे. चार पिढ्यांपासून हजारो विद्यार्थी घडल्याने इमारत जमीनदोस्त होऊ नये यासाठी प्रयत्न होण्याची आज गरज आहे.

बॉक्स

अधिकारी, राजकारणी अन् उत्कृष्ट नागरिक घडले

लाखांदूर तालुक्यातील शेवटचे गाव म्हणजे सोनी. गडचिरोली, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर आहे. चुलबंद व वैनगंगा नदीचा संगम देखील आहे. पूर्वीच्या काळी या लगतच्या तीन जिल्ह्यातील विद्यार्थी या शाळेत शिक्षणाचे धडे गिरवीत असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. या शाळेतून शेकडो अधिकारी, राजकारणी व उत्कृष्ट नागरिक घडले आहेत. आजही येथील मुख्याध्यापक महारुद्र केंद्रे यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात सहकारी शिक्षक विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसह कलात्मक गुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम राबवित आहेत.