शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

बंधने झुगारुन साजरा झाला ‘व्हॅलेंटाईन डे’

By admin | Updated: February 15, 2015 00:36 IST

भंडारा शहर प्रतिनिधी : प्रेम हे अडीच शब्दाचे वाक्य. म्हणायला अवघड नसले तरी ते व्यक्त करताना अनेकांची भंबेरी उडते. प्रेम हे आंधळे असते. प्रेमाला उपमा नाही.

भंडारा : भंडारा शहर प्रतिनिधी : प्रेम हे अडीच शब्दाचे वाक्य. म्हणायला अवघड नसले तरी ते व्यक्त करताना अनेकांची भंबेरी उडते. प्रेम हे आंधळे असते. प्रेमाला उपमा नाही. महाविद्यालयीन युवक-युवतींसोबतच विवाहितांचे गुलाबी प्रेमप्रकरण समोर येत आहेत. अशा प्रेमविरांच्या पर्वणीचा दिवस म्हणजे 'व्हॅलेंटाईन डे'. शनिवारी प्रेमविरांनी सर्व बंधने तोडून हर्षोल्हासात साजरा केला. व्हॅलेंटाईन डेसारख्या पाश्चात्य संस्कृतीमुळे भारतीय संस्कृती धोक्यात आली आहे. भारतीय संस्कृतीला जगात मोठे मानाचे स्थान आहे. येथील संस्कृती शिकायला जगातील युवक-युवती भारतात येतात. मात्र, या संस्कृतीला पाश्चात्य संस्कृतीमुळे आता धोका निर्माण झाला आहे. महाविद्यालयीन युवक-युवतींसाठी तर व्हॅलेंटाईन डे मोठ्या पर्वणीचा दिवस असतो. या दिवसाची हा युवावर्ग मोठ्या उत्सुकतेने वाट बघत असतात. आज युवावर्गाने गुलाबाचे फुल देऊन प्रेम व्यक्त केले. यामुळे बाजारात गुलाबाच्या फुलाचे भावही वधारलेले होते. अनेक युवक-युवती नानाविध कारणे सांगून घराबाहेर पडलेत. महाविद्यालय किंवा नियोजित ठिकाण गाठून प्रियकर किंवा प्रेयशीसोबत ते निवांत ठिकाणी जाऊन दिवस घालविला. शनिवार असल्याने व्हॅलेंटाईन दिन अविस्मरणीय व्हावा, यासाठी अनेक युगुलांनी कोरंभी, रावणवाडी अशा पर्यटनस्थळी घालविला. तर काहींनी देवदर्शन घेऊन पुढील वाटचालीसाठी देवाला साकडे घातले. (शहर प्रतिनिधी)व्हॅलेंटाईन डे, रोमच्या एका पुजारीच्या नावावर मनविण्यात येतो. इसवी सन २६९ मध्ये ते शहीद झाले आणि १४ फेब्रुवारी २६९ ला फ्लेमिनियात दफन केले. त्यांच्या थोरवीमुळे त्यांची आठवण सदोदित रहावी यासाठी हा दिवस सर्वत्र साजरा करण्यात येतो. भारतात १९९२ पासून व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात येत आहे. पाश्चिमात्य संस्कृतिमुळे भारतीय संस्कृतीला धोका पोहचत आहे. देशातील अनेक थोर महात्म्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान देऊन देशाला स्वातंत्र्य करून दिले. त्यांचे स्मरण रहावे, यासाठी जयंती व पुण्यतिथी सारखे कार्यक्रमा ऐवजी आता व्हॅलेंटाईनला महत्व प्राप्त होत असल्याने हिंदूत्ववादी संघटनांनी याला विरोध केला आहे.व्हॅलेंटाईन डे ही पाश्चिमात्य संस्कृती असल्याने भारतीय संस्कृतीला धोका निर्माण होत असल्याचा आव हिंदूत्ववादी संघटनांनी आणला. देशभरात या विरोध होत असताना भंडारा शहरात मात्र याचा अपवाद दिसून आला.