शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पबाधित क्षेत्रातील जाचक अटी रद्द होणार

By admin | Updated: March 18, 2016 00:34 IST

राज्यात अनेक ठिकाणी मोठमोठी सिंचन प्रकल्प बांधण्यात आली तर काहीचे काम सुरू आहे.

काशीवार यांची विधानसभेत मागणी : लवकरच परिपत्रक काढण्याचे आश्वासनसंजय साठवणे साकोलीराज्यात अनेक ठिकाणी मोठमोठी सिंचन प्रकल्प बांधण्यात आली तर काहीचे काम सुरू आहे. मात्र या परिसरातील शेतकऱ्यांना जमीन विक्रीसाठी बऱ्याच जाचक अटीचा सामना करावा लागतो. त्यामुळे शेतकरी हवालदिल होऊन शेती एजंटमार्फत विकतो. यात शेतकऱ्याचे नुकसान होते त्यामुळे प्रकल्पबाधीत क्षेत्रातील शेतीच्या विक्रीसाठी असलेल्या जाचक अटी शिथील करण्यात यावी, अशी आग्रही मागणी साकोलीचे आमदार बाळा काशीवार यांनी विधानसभेत केली. त्यानंतर महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याशी चर्चा करून त्यासंबंधीचे परिपत्रक काढण्याची मागणी केली.शेतीला सिंचनाची सोय व्हावी म्हणून राज्यात मोठमोठे सिंचनप्रकल्प बनविण्यात आले. काही ठिकाणी प्रकल्पाचे काम सुरू आहे. या सिंचन प्रकल्पाचा फायदा सिंचनासाठी होणार आहे. मात्र निसर्गाचा लहरीपणा व दिवसेंदिवस उत्पन्नात होणारी घट यामुळे शेतकरी आर्थिक टंचाईत सापडला आहे. शेतकऱ्यांना जीवन जगताना नानाविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत मुलांचे शिक्षण, मुलामुलीचे विवाह, कुटूंबातील सदस्यांचे आजारपण यासारख्या विविध कामासाठी शेती विकावी लागते. अशावेळेस प्रकल्पबाधीत क्षेत्रातील शेती विकताना ५ एकरखालील शेती विक्रीला मध्यम प्रकल्प लघु पाटबंधारे विभागाची परवानगी घ्यावी लागते. मात्र ५ एकरपेक्षा जास्त शेतीची विक्री करतानी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागते. ही परवानगी घेताना अनेक जाचक अटी व नियमांची पुर्तता शेतकऱ्यांना करून घ्यावी लागते. मात्र या अटीपुर्ण करताना शेतकऱ्याची दमछाक होते. परिणामी शेतकरी शेती विकू शकत नाही, त्यामुळे त्याची नियोजित कामे होत नाहीत.या जाचक अटीमुळे शेतकरी हवालदिल होतो. शेवटी शेती विक्रीशिवाय त्याच्यासमोर पर्याय नसल्याने तो दलालाला शरण जातो. हे दलाल शेतकऱ्यांच्या जमिनीला कवडीमोल किंमत देऊन जास्तीचा पैसा आपल्या खिशात टाकतात. यामुळेही शेतकरी आर्थिक संकटात सापडत आहे. त्यामुळे प्रकल्पबाधीत परिसरातील शेतीविक्रीकरीता शासनाने लावलेल्या जाचक अटी शिथील करण्यात यावे, अशी मागणी आमदार बाळा काशीवार यांनी सभागृहात केली. यावेळी त्यांनी महसुलमंत्री एकनाथ खडसे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी हा प्रश्न लवकरच निकाली काढू, असे आश्वासन त्यांना दिले.