शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

बीटीबीची जमीन रद्द करून महिला रुग्णालय सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2016 00:31 IST

भंडारा शहर काँग्रेस कमिटीतर्फे शहर अध्यक्ष सचिन घनमारे यांच्या नेतृत्वात बीटीबी कंपनीला मिळालेली...

शहर काँग्रेस कमिटीचा आंदोलनाचा इशारा : जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन भंडारा : भंडारा शहर काँग्रेस कमिटीतर्फे शहर अध्यक्ष सचिन घनमारे यांच्या नेतृत्वात बीटीबी कंपनीला मिळालेली जागा त्वरित रद्द करून महिला रुग्णालय सुरू करण्यात यावे, अशी मागणी जिल्हाधिकारी यांचे मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.भंडारा येथील जलशुद्धीकरण केंद्रा लगतची प्लॉट क्रमांक २०/४ एकूण एरिया १६८३३.२ चौ.मी. ही जागा नगर परिषद भंडारा यांनी स्थानिक ठराव घेवून अधिकार नसताना ग्रीन झोन मधील व भंडारा शहर फिल्टर केंद्राला लागून तसेच मुख्य मेन रोड, शासकीय रुग्णालय व मुख्य रस्त्यावर असलेली मौक्यावरची जागा बीटीबी कंपनी यांना देण्यात आली. याचा विरोध भंडारावासीयांनी केल्यानंतर शासनाने कार्यवाही केल्यामुळे सदरचे बांधकाम थांबविण्यात आले होते. तसे आदेश गैरअर्जदार व नगर परिषद भंडारा यांना कळविण्यात आले होते.बीटीबी कंपनी गैरअर्जदार यांनी स्टे असतानी शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून विकसीत कामे सुरू केली. सदर कृत्य चूकीचे असून नगर परिषद भंडाराचे अधिकारी व पदाधिकारी सत्तापक्ष राष्ट्रवादी व भारतीय जनता पार्टी यांच्या हेतुपुरस्पर संगणमताने सत्तेचा दुरूपयोग करून कोट्यवधींची जागा बीटीबी कंपनीला नफ्याच्या दृष्टीकोनातून देण्यात आली. सदर मंडी जलशुद्धीकरण केंद्राजवळ लागून असल्याने अस्वच्छतेमुळे तसेच येथील पाणीपुरवठा संपूर्ण भंडारावासीयांना होत असून याचा दुष्परिणाम जनतेच्या आरोग्यावर होऊ शकतो. याकरिता गैरअर्जदार कंपनीने प्रदूषण विभागाची कोणतीही परवानगी घेतली नाही. पाणी केंद्र व परिसर प्रदूषीत होणार नाही, याची हमी कोणी घ्यावी हा प्रश्न संपूर्ण शहराला चिंतेचा विषय ठरला आहे.सदर मंडी जलशुद्धीकरण केंद्राजवळ लागून असल्याने अस्वच्छतेमुळे तसेच येथील पाणीपुरवठा संपूर्ण भंडारावासीयांना होत असून याचा दुष्परिणाम जनतेच्या आरोग्यावर होऊ शकतो. गैरअर्जदार कंपनीने प्रदूषण विभागाची कोणतीही परवानगी घेतली नाही. पाणी केंद्र व परिसर प्रदूषित होणार नाही, याची हमी कोणी घ्यावी हा प्रश्न संपूर्ण शहराला चिंतेचा विषय ठरला आहे.महाराष्ट्रात भंडारा जिल्ह्याला दोन दोन खासदार लाभले असून जनतेचे पदर अजुन रिकामे आहे. दोन्हीही खासदार मुंग गिळून बसले आहेत. महिला रुग्णालयाच्या प्रश्नांवर कुणीही बोलायला तयार नाही. भंडारा जिल्ह्याचे शिवसेनेचे पालकमंत्री हे आरोग्य मंत्री असूनसुद्धा जिल्ह्यातील महिलांकरिता महिला रुग्णालयासाठी काहीच करीत नाही. यावरून यांची जिल्ह्यातील आरोग्यविषयीची तत्परता दिसून येत आहे. महिला सक्षमीकरणाचे आणि सक्षम आरोग्याचे आश्वासन फोल ठरलेले दिसते तसेच हास्यास्पद व निंदनिय आहे.जेव्हापर्यंत महिला रुग्णालयाची जागा आवंटीत करून रुग्णालयाच्या कामाला सुरूवात होत नाही तोपर्यंत आरोग्य विभागाचे आरोग्य मंत्री डॉ. दिपक सावंत यांना भंडारा शहरात प्रवेश देण्यात येणार नाही, असा इशारा शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने देण्यात आला. सदर जागा महिला रुग्णालयाकरीताच देण्यात यावी अन्यथा महिला रुग्णालयाला न दिल्यास भंडारा शहर काँग्रेस कमिटी जनतेसोबत रस्त्यावर उतरून महिला रुग्णालयासाठी लढा देईल व आंदोलन करेल, असा इशारा निवेदनातून दिला आहे.यावेळी तालुका अध्यक्ष राजकपूर राऊत, अनु. जाती जिल्हाध्यक्ष अजय गडकरी, जि.प. सदस्य प्यारेलाल वाघमारे, जि.प. सदस्य प्रेमदास वनवे, जि.प. सदस्य निलकंठ कायते, प्रविण भोंदे, शर्मिल बोदेले, जनार्धन निंबार्ते, मंगेश हुमणे, संदेश शामकुवर, विलास मोथरकर, दिलीप गायधने, विनीत देशपांडे, सुरेश होलघरे, द्वारकानाथ गोंडाणे, विजय भुरे, अंकुश वंजारी, शंकर लांबट, शालीक भुरे, लक्ष्मीकांत साकुरे, राधेश्याम गायधने, कुंदा वाघाडे, निता नागफासे, गजानन मोहरकर, रविंद्र चोपकर, मुलचंद ईश्वरकर, शिला कांबळे, प्रदिप ईश्वरकर, महेंद्र कांबळे, पराग खोब्रागडे, घनश्याम भांडारकर, सुरेश गोन्नाडे, अखिल तिवाडे, विपुल खोब्रागडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)