शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

रेतीचे नियमबाह्य लिलाव रद्द करा

By admin | Updated: February 12, 2016 01:25 IST

मोहाडी तालुक्यातील ढिवरवाडा रेतीघाट येथून रेतीचे लिलाव नियमबाह्य झाले आहे. त्यामुळे ते लिलाव रद्द करण्यात यावे, अशी मागणी

भंडारा : मोहाडी तालुक्यातील ढिवरवाडा रेतीघाट येथून रेतीचे लिलाव नियमबाह्य झाले आहे. त्यामुळे ते लिलाव रद्द करण्यात यावे, अशी मागणी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शहजादाभाई यांनी आयोजित पत्रपरिषदेत केली. यावेळी ते म्हणाले, ढिवरवाडा रेतीघाट येथून चोरटी वाहतुकीमुळे जप्त करण्यात आलेल्या रेतीचे रितसर लिलाव ५ जानेवारी रोजी करण्यात आले. त्यात उच्चबोली करणारे सरपंच नरेश ईश्वरकर यांना बोली झाली. लिलाव रक्कममधून १२ टक्के रक्कम लिलावात जमा करण्यात आली. परंतु अधिकाऱ्यांनी शिल्लक रक्कम जमा करण्यासाठी नियमानुसार पुरेसा वेळ दिला नाही. ते लिलाव रद्द करण्यात आले. बोली लावणाऱ्यांना कुठलिही सूचना न देता ताबडतोब डंपींग रेतीचे दुसऱ्यांदा लिलाव काढण्यात आले. यात अधिकाऱ्यांनी संगणमत करून ९ लाख सात हजार रूपयात बोली दिली. प्रथम लिलावामध्ये प्रथम बोली २० लाख रूपये आणि दुसऱ्या बोलीमध्ये १९ लाख ५० हजार रूपयांमध्ये होती. नियमानुसार दुसरी बोली लावणाऱ्याला प्राधान्य न देता किंवा बोली लावणारी जाहिरात न देता अधिकाऱ्यांनी शासनाचा १० लाखांचा महसूल बुडविला आहे. ८ फेब्रुवारी रोजी पुनरलिलाव करण्यात आला. तो लिलाव अवैध ठरवून रद्द करण्यात यावे, एसडीओ, तहसिलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्यावर चौकशी नेमूण कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शहजादाभाई यांनी करुन गैरव्यवहार करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी रेती उचल करण्यावर स्थगिती देण्यात येत असल्याचे आश्वासन दिले. यावेळी मकसूद पटेल, रामू माथनीकर, बालू बोंदरे, इब्राहम शेख उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी )