शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
4
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
5
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
6
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
7
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
8
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
9
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
10
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
11
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
12
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
13
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
14
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
15
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
16
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
17
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
18
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
19
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
20
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

कोतवाल भरती रद्द करा : अन्यथा उपोषण

By admin | Updated: July 3, 2014 23:25 IST

साकोली तालुक्यात नुकतीच पार पडलेली कोतवाल भरती प्रक्रीयेत मोठ्या प्रमाणात घोळ करण्यात आला असून अधिकाऱ्यांनी मनमर्जीने व भ्रष्टाचार करून भरती प्रक्रिया करण्यात आली.

साकोली : साकोली तालुक्यात नुकतीच पार पडलेली कोतवाल भरती प्रक्रीयेत मोठ्या प्रमाणात घोळ करण्यात आला असून अधिकाऱ्यांनी मनमर्जीने व भ्रष्टाचार करून भरती प्रक्रिया करण्यात आली. यात पात्र उमेदवारावर अन्याय करण्यात आला. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर कार्यवाही करण्यात यावी व ही भरती प्रक्रिया रद्द करण्यात यावी, अशी मागणी आंबेडकर सेक्टर फाूर जस्टीस अ‍ॅन्ड पीस संघटनेचे अध्यक्ष विलास मेश्राम यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनातून केली आहे.या निवेदनाप्रमाणे, साकोली तालुक्यातील कोतवाल भरती प्रक्रिया २०१४ ही पारदर्शकरित्या न करता भ्रष्टाचारी पद्धतीने करण्यात आली. तहसीलदार साकोली यांनी आपल्या मनमर्जीने उमेदवारांची पात्रता लक्षात न घेता भरती प्रक्रिया राबविली. यामुळे भ्रष्टाचारी पद्धतीने प्रक्रिया राबविल्याचे परिसरात बोलले जात आहे. यामध्ये क्रमांक १ व २ नंबरचे गुण घेवून परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना घरचा मार्ग दाखविण्यात आला आहे व वाममार्गाने जाणाऱ्यांना पात्र ठरवून अंतिम यादी दि. १ जुलैला तोंडी परीक्षेचे दिवशी न लावता दि.२ जुलैला सायंकाळी ७.१५ ला तहसील कार्यालयाच्या दरवाज्याला लावण्यात आली. त्यामुळे ही भरती प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात अडकलेली आहे. यामुळे हुशार उमेदवारावर अन्याय झाल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे ही भरती प्रक्रियाच रद्द करण्यात येवून दि.१ ला घेण्यात आलेली तोंडी परीक्षा रद्द करावी व तोंडी परीक्षा घ्यायचीच झाल्यास छायाचित्रीकरणात घेण्यात यावी. या भरती प्रक्रियेची चौकशी करून ताबडतोब दोषी अधिकाऱ्यावर कार्यवाही करण्यात यावी व अन्यायग्रस्त उमेदवारांना न्या देण्यात यावा व ही भरती प्रक्रिया रद्द न झाल्यास संपूर्ण अन्यायग्रस्त उमेदवार तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करतील, असा इशाराही देण्यात आला आहे. (तालुका प्रतिनिधी)