शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

होमगार्ड पुनर्नियुक्तीचा शासन निर्णय रद्द करा

By admin | Updated: July 4, 2016 00:36 IST

होमगार्ड संघटनेतील स्वयंसेवकांना पुनर्नियुक्ती देण्याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाकडून १५ एप्रिल २०१० काढण्यात आला.

मुख्यमंत्र्यांना निवेदन : संघटनेतील व्यक्ती ही पुनर्नियुक्तीस पात्र असेल व ती वयाच्या ५५ व्या वर्षापर्यंत संघटनेत राहू शकेल अशी तरतूद साकोली : होमगार्ड संघटनेतील स्वयंसेवकांना पुनर्नियुक्ती देण्याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाकडून १५ एप्रिल २०१० काढण्यात आला. त्यात राज्याच्या महासमादेशक यांनी पुनर्नियुक्ती देण्यासंबधीच्या विविध प्रकारच्या जाचक नियम व अटी घालून वेगवेगळे निकष लावून निर्गमित केले आहेत. त्या परिपत्राबाबत महासमादेशक कार्यालयाला शासनाने कोणतेही आदेश किंवा परिपत्रक पारित केलेले नसल्याने संपूर्ण परिपत्रकच रद्द करण्यात यावे, अशी मागणी होमगार्ड संघटनेतर्फे मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.होमगार्ड स्वयंसेवकांना दर ३ वर्षांनी पुनर्नियुक्ती देण्याच्या अधिकाराबाबत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार पहिली ६ वर्षासंबधीत जिल्हा समादेशक, पुनर्नियुक्तीचे अधिकार देण्यात आलेले असून ६ वर्ष झाल्यानंतर पुढील ६ वर्षांसाठी महासमादेशक किंवा उपमहासमादेशक, होमगार्ड, महाराष्ट्र राज्यात पुनर्नियुक्तीचे अधिकार देण्यात आलेले आहेत. त्यानुसार होमगार्ड संघटनेत एकूण १२ वर्ष सेवा झालेल्या होमगार्डच्या पुनर्नियुक्तीकरिता विचार करण्यात येणार नाही, असेही नमूद आहे. संघटनेत नियुक्ती केलेली व्यक्ती ही पुनर्नियुक्तीस पात्र असेल व ती वयाच्या ५५ व्या वर्षापर्यंत संघटनेत राहू शकेल अशी तरतूद आहे.शासन निर्णय घेताना तत्कालीन गृहमंत्री यांची मंजुरी घेतलेली आहे. सदर नस्ती बदल करण्याकरिता आवश्यक असलेले व विधान परिषद यांची मंजुरी घेतल्याची कुठलीही नोंद नाही. तसेच राज्याचे राज्यपाल यांची संमती घेऊन अधिनियमातील बदल केल्याचे शासन राजपत्राची प्रत सदर नस्तीत नाही. महासमादेशक कार्यालयाकडे बदल केल्याचा राजपत्र नमूद अधिसूचनेची प्रत माहिती अधिकार अधिनियमात मागितलेली होती. परंतु, महासमादेशक कार्यालयाने अधिनियमातील बदल केल्याची शासन पत्राची पत्र सदर नस्तीत नाही, असे उत्तर दिलेले आहे. नियमानुसार यात पुनर्नियुक्तीकरिता शासन निर्णयाचे बदल केलेले आहे. त्या बदलीची अधिसूचना प्रसिध्द झालेली नाही. तसेच या बदलास आवश्यक असलेली राज्यपाल, विधानसभा व विधानपरिषद या दोन्ही सभागृहाची संमती नाही. त्यामुळे बदली अवैध ठरत असल्याने हा शासन निर्णय रद्द करण्यात यावा. अशी मागणी राज्याच्या होमगार्ड संघटनेतर्फे मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)खासदार, आमदारांशी चर्चाशासन निर्णय रद्द संदर्भाने होमगार्ड सैनिकांनी खा.नाना पटोले तसेच आ. बाळा काशिवार यांची भेट घेवून चर्चा करून सदर शासन निर्णय रद्द करण्यात यावा या मागणीचे निवेदन दिले. दरम्यान दि. ५ जुलै रोजी मुंबई येथे मुख्यमंत्री यांचेशी चर्चा करून हा शासन निर्णय रद्द करण्यात यावा, अशी मागणी करून होमगार्डवर होणारा अन्याय दूर करणार असल्याची ग्वाही खासदार नाना पटोले यांनी यावेळी दिली. निवेदन देतेवेळी मोहाडी, पवनी, तुमसर साकोली, अड्याळ पवनी, भंडारा आदी होमगार्ड पथकातील होमगार्ड सैनिक उपस्थित होते.