शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

पीक वाचविण्यासाठी कालव्याचे खोदकाम

By admin | Updated: September 19, 2016 00:36 IST

पावसाचा अभाव , सिंचन साधन नाही त्यामुळे मासळ परिसरातील हजारो एकर शेती मागील चार वर्षांपासून नापिकीची ठरली.

८५० एकर शेतीला लाभ : बाळा काशिवार यांच्या प्रयत्नाला यशलाखांदूर : पावसाचा अभाव , सिंचन साधन नाही त्यामुळे मासळ परिसरातील हजारो एकर शेती मागील चार वर्षांपासून नापिकीची ठरली. मात्र यावर्षी नेरला उपसा सिंचनचे पाणी गावाजवळून वाहत असल्याने तब्बल तीन किमी कालव्याचे खोदकाम करून शेतीला पाणी देण्यात आले. आमदार बाळा काशिवार यांच्या प्रयत्नाला यश आल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.मागील चार वर्षांपासून अपुरा पाऊस, वर थेंबी शेती त्यामुळे या भागातील शेती पिकवने शेतकऱ्यांसाठी डोकेदुखीची झाली होती. कशी-बशी पेरलेली पिके पाण्याअभावी करपल्याने पेटवल्याशिवाय पर्याय उरला नव्हता. एकूणच या भागातील उत्पन्नात कमालीची घट झाली होती. मात्र जवळूनच नेरला उपसा सिंचन योजनेचा कालवा भरभरून वाहत सुटल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. परंतु कालव्याचे पाणी शेतापर्यंत पोहोचणे कठीणच नाही तर अशक्य होते. परंतु धान पीक या वर्षी तरी वाचवायचे म्हणून शेतकऱ्यांनी कंबर कसली. आमदार बाळा काशिवार व किशोर पंचाभाई यांना भेटून सर्व परिस्थिती सांगितली. शेतकऱ्यांचे धान पीक मरू देणार नाही पाणी शेतात पोहोचण्यासाठी सर्वतोपरी मदत करू, म्हणून दोन जेसीबी च्या साहायाने चक्क तीन किमी कालव्याचे खोदकाम करण्यात आले. यावेळी जवळपासच्या गावातील शेतकऱ्यांनी श्रमदान केले. आमदार बाळा काशिवार यांनी नेरला उपसा सिंचन योजनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून पाणी देण्याचे मान्य केले.पेंढरी, सोनेगाव, हारादोली या तीन गावातील जवळपास ८५० एकर धान शेती सिंचीत होणार असून सतत कोरडे राहणारे चार तलाव पाण्याने तुडुंब भरणार आहेत. सदर कालव्याचे बांधकाम केल्यास या भागातील हजारो हेक्टर शेतजमीन सिंचित होऊन उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांचा आर्थीक स्तर नक्कीच उंचावणार आहे. यावेळी आ. बाळा काशिवार, किशोर पंचभाई, मनोज चुटे, माजी पं.स.सदस्य देविदास भोयर, सरपंच पेंढारी प्रदीप शेंडे, सरपंच तिरखुरी हरिषचंद्र गेडाम, पंचायत समिती सदस्य पुंडलिक पेलणे, बंडू बारसागडे, व शेकडो शेतकरी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणारतालुक्यातील चौरास भागात गोसे खुर्द धरणाच्या डाव्या कालव्याचे जाळे पसरले आहेत. मात्र नियोजन शून्य कारभारामुळे पाणी शेतापर्यंत पोहोचत नाही. ही बोंब या वर्षी सर्वच भागात ऐकायला मिळाली. त्यामुळे सर भागातील शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेऊन सोडविल्या. शेतकऱ्यांची बाजू रास्त समजून त्यांच्या समस्या प्राथमिकतेने सोडविण्यावर आपला भर राहणार असल्याचे आमदार बाळा काशिवार यांनी सांगितले.