शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांच्या आवागमनाने बसस्थानके फुलली

By admin | Updated: October 21, 2014 22:46 IST

दिवाळीनिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढू लागल्याने शहरातील राज्य म हामार्ग परिवहन महामंडळाची बसस्थानके फुलू लागली आहेत. भंडारा व वरठी रेल्वे स्टेशन या स्थानकांवर प्रवाशांची

भंडारा : दिवाळीनिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढू लागल्याने शहरातील राज्य म हामार्ग परिवहन महामंडळाची बसस्थानके फुलू लागली आहेत. भंडारा व वरठी रेल्वे स्टेशन या स्थानकांवर प्रवाशांची सकाळपासूनच गर्दी झाली होती. त्यानुसार एस.टी. प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी जादा गाड्यांची व्यवस्थाही केली आहे.दिवाळी दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे बाहेरगावाहून भंडारा येथे कामानिमित्त आलेल्या चाकरमान्यांना गावी जाण्याचे वेध लागले आहेत. मुलांच्या सत्र परीक्षाही संपल्या असून शाळांना सुट्या लागल्या आहे. परिणामी मंगळवार बस स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी दिसून आली. सकाळपासून विविध मार्गावर जाणाऱ्या बससाठी प्रवाशांचा ओघ सुरु होता. काही ठिकाणी तिकीटासाठी लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र होते. त्यातच काही बस उशीरा येत असल्याने प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागत होते. भंडारा बसस्थाकावरून अमरावती, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा यासह जिल्ह्यांतर्गत ग्रामीण भागात जाणाऱ्या गाड्यांमध्ये प्रवासी खच्चून बसल्याचे तथा उभे असल्याचे दिसून येत आहे.दिवाळी हा मुख्य सण असल्याने गावाकडे जाणाऱ्यांची संख्या यादिवसात वाढते. त्यामुळे आणखी गर्दी वाढण्याची शक्यता आहे. नेहमीपेक्षा मंगळवारी बसस्थानकावर गर्दी जास्त होती. प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या भंडारा आगाराच्या वतीने जादा बस गाड्या सोडण्यात येत आहेत. गर्दीमुळे सामान व लहान मुलांना सांभाळताना प्रवाशांची कसरत होत आहे. ज्या मार्गावर अधिक गर्दी आहे. तिथे रापच्यावतीने तातडीने बस उपलब्ध करून दिली जात आहे. (शहर प्रतिनिधी)