शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे कामकाज बंगल्यावरुन

By admin | Updated: April 28, 2017 00:30 IST

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शरद अहिरे यांचे सध्याचे कार्यालय जिल्हा परिषदेमधील त्यांचे कक्ष नसुन त्यांचा शासकीय बंगला बनला आहे.

प्रवेशद्वाराला कुलूप : अर्थपूर्ण व्यवहाराची कुजबूज भंडारा : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शरद अहिरे यांचे सध्याचे कार्यालय जिल्हा परिषदेमधील त्यांचे कक्ष नसुन त्यांचा शासकीय बंगला बनला आहे. त्यांच्या बदलीचे आदेश धडकल्यानंतर त्यांनी जिल्हा परिषद कार्यालयात उपस्थिती दर्शविली. जिल्हा परिषदमध्ये न राहता कामकाज त्यांनी बंगल्यारून सुरु केले आहे. शासकीय कामांच्या सर्व फाईल्स् बंगल्यावर बोलवत असून ‘अर्थपूर्ण’ फाईल्स् मार्गी लावण्याचा सपाटा लावला आहे. ग्रामीण विकासाचा कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिनी मंत्रालयाचे कर्णधार असलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी शरद अहिरे यांची बदली झाली आहे. त्यामुळे येत्या कालावधीत त्यांना भंडारा मुख्यालय सोडून बदलीच्या ठिकाणी रूजू व्हायचे. मात्र जाण्यापूर्वी मागील वर्षभरापासून अडकलेल्या महत्त्वाच्या कामांचा फाईल्स् मार्गी लागाव्यात यासाठी त्यांची स्वाक्षरी महत्वाची आहे. पदोन्नती झाली असल्याने जिल्हा परिषदमधील कार्यालयात बसून कुठलेही प्रकरण अंगावर येऊ नये यासाठी त्यांनी नविन शक्कल लढविली आहे. जिल्हा परिषदमधील शासकीय कार्यालयात बसून काम करण्याऐवजी त्यांच्या बंगल्याला कार्यालय बनविले आहे. येथूनच सहा दिवसांपासून त्यांनी अनेक फाईल्स् मार्गी लावल्याचे समोर आले आहे. मात्र ज्या फाईल्स्ची ‘आर्थिक गुणवत्ता’ चांगली अशांनाच त्यांनी मार्गी लावल्याची कर्मचाऱ्यांमध्ये कुजबूज आहे. त्यांच्यार् काळातील थांबलेल्या फाईल्स यानिमित्ताने पुढे सरकत आहेत. याबाबत सीईओ अहिरे यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही. (शहर प्रतिनिधी) प्रवेशद्वाराला कुलूप सीईओ शरद अहिरे यांच्या शासकीय बंगल्याच्या प्रवेशद्वारात कुणीही येऊ नये याकरिता त्यांनी मुख्य प्रवेशद्वारालाच कुलूप लावले आहे. हे कुलूप केवळ रात्रीलाच नव्हे तर दिवसभर लावून राहते. या प्रवेशद्वाराजवळ एका शिपायाला बसविण्यात आले आहे. बाहेरुन कुणी फाईल्स् आणली तर ती नेवून देण्याची जबाबदारी या शिपायावर सोपविली आहे. रात्री जिल्हा परिषदमधील एका विभागाच्या शिपायाची पहिल्यांदाच नियुक्ती केली. या शिपायाला सीईओंनी बाहेर न जाण्याची चांगलीच तंबी दिल्याची बाब आज सकाळी उघडकीस आली. साहेबांच्या बंगल्यावर सकाळी व रात्रीला अनेकांची हातात फाईल्स् घेऊन असल्याची उपस्थिती दिसून येते.