शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटिशकालीन आणेवारी पद्धत शेतकऱ्यांसाठी घातक

By admin | Updated: November 10, 2014 22:38 IST

भारतावर अनिर्बंध सत्ता गाजविणारे ब्रिटिश देशातून निघून गेल्यानंतरही आणेवारीची पद्धत अद्यापही कायम आहे. यामुळे शेतकरीवर्ग मात्र देशोधडीला लागत असल्याने ही आणेवारी पद्धती बदलण्याची

भंडारा : भारतावर अनिर्बंध सत्ता गाजविणारे ब्रिटिश देशातून निघून गेल्यानंतरही आणेवारीची पद्धत अद्यापही कायम आहे. यामुळे शेतकरीवर्ग मात्र देशोधडीला लागत असल्याने ही आणेवारी पद्धती बदलण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.पारतंत्र्याच्या काळात शेतीचे उत्पन्न कमी प्रमाणात होते. त्या काळामध्ये शेती उद्योग श्रेष्ठ समजला जाई. कालांतराने देशाला स्वातंत्र्य मिळाले. शेती उद्योगामध्ये नवीन क्रांती झाल्यामुळे शेती उत्पादनात कमालीची वाढ झाली. मात्र स्वातंत्र्यानंतर किचकट कायद्यामुळे शेतीकडे दुर्लक्ष होऊ लागले. ब्रिटिश आपल्या देशातून निघून गेले तरी ब्रिटिशांनी तयार केलेले शेतीविषयक कायदे अद्यापही कायमच आहेत.ब्रिटिशांच्या काळात एका एकरात झालेल्या उत्पन्नासाठी १०० पैसे आणेवारी दाखविण्यात येत होती. निसर्गाने कोणतीही अवकृपा केली तरी आणेवारी जास्त दाखविली जात असल्याने शासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत देण्यात येत नव्हती. लावण्यात आलेली आणेवारी १५ सप्टेंबरपर्यंत दुर्लक्षित समजली जात होती. १५ आॅक्टोबरपर्यंत हंगामी तर १५ नोव्हेंबरपर्यंत सुधारित आणेवारी लावण्यात येत होती. लावल्या आणेवारीवर कुणीही आरोप घेतला नाही तर १५ जानेवारीपर्यंत शासनाकडून अंतिम आणेवारी जाहीर केली जात असे. ही पद्धत अद्यापही प्रचलित आहे.शेतकरी वर्ग आणेवारी पद्धत बदलविण्यासाठी पुरेशा प्रमाणात आग्रह धरीत नसल्याचे निदशर्नास येत आहे. ज्यावेळी निसर्गाची अवकृपा होते, पूर, अतवृष्टीमुळे उत्पादनात घट होते, अशावेळी शेतकरी शासनाकडून मदतीच्या प्रतीक्षेत असतात. मात्र शासनाकडून अनेकदा ५० पैशांपेक्षा जास्त आणेवारी काढली जात असते यामुळे मोर्चे काढून, आंदोलने करूनही अनेकदा दखल घेतली जात नाही.मागील काही वर्षांपासून भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कधी कोरड्या तर कधी ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागतो. परंतु प्रशासनाच्यावतीने आणेवारी काढताना अनेकदा ५० पैशांपेक्षा जास्त आणेवारी काढली जाते. यामुळे शासनाच्यावतीने मिळणाऱ्या मदतीपासून भंडारा जिल्ह्यातील शेतकरी वंचित राहतात. यावर्षी शासनाच्यावतीने दुष्काळग्रस्तांसाठी विविध सोई-सवलती जाहीर करण्यात आल्या. शासनाने मात्र भंडारा जिल्ह्यातील जवळपास सर्वच गावांची आणेवारी ५० पैशांपेक्षा जास्त दाखविल्याने अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळग्रस्त कालावधीत पुरविण्यात येणाऱ्या एकाही सोई-सुविधांचा लाभ मिळत नाही. यामुळे शासनाने ब्रिटिशकालीन आणेवारी काढण्याची पद्धत रद्द करून सुधारित पद्धतीने आणेवारी काढावी, अशी मागणी होत आहे. (शहर प्रतिनिधी)