शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराज्यीय मार्गावरील पूल झाला खड्डेमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2021 05:00 IST

हा पूल वळण मार्गावर असल्याने त्यामुळे अधिक धोका येथे निर्माण झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. यापूर्वीही पुलाचा रस्ता व पुलावरील खड्डे या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधण्यात आले होते. परंतु उन्हाळा उलटून गेल्यावरही पुलाचा ॲप्रोच रस्ता व पुलावरील खड्डे बुजविण्यात आले नाहीत. यामुळे या बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आंतरराज्य मार्ग असल्यामुळे या रस्त्यावर जड वाहतूकही मोठ्या प्रमाणात आहे.

ठळक मुद्देतुमसर - पवनारा मार्गावरील पूल : ॲप्रोच रस्ताही खड्डेमय, बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

लाेकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर - कटंगी आंतरराज्य मार्ग ३५६ वर पवनारा शिवारात केवळ दोन वर्षांपूर्वी कोट्यवधींच्या पुलाचे बांधकाम करण्यात आले. परंतु पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पुलावरील मार्ग खड्डेमय झाला असून खड्ड्यांत पाणी साचले आहे. या पुलाचा ॲप्रोच रस्ता पूर्णत: उखडलेला आहे. त्यामुळे वाहनधारकांचा जीव धोक्यात आला आहे. या पुलाच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. पवनारा शिवारात दीड ते दोन वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून पूल बांधकाम करण्यात आले. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच या पुलाचा रस्ता खड्डेमय झाला असून पुलावरही खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांत पाणी साचल्यामुळे पुलावरून वाहतूक करताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते. खड्डे वाचवताना येथे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. हा पूल वळण मार्गावर असल्याने त्यामुळे अधिक धोका येथे निर्माण झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. यापूर्वीही पुलाचा रस्ता व पुलावरील खड्डे या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधण्यात आले होते. परंतु उन्हाळा उलटून गेल्यावरही पुलाचा ॲप्रोच रस्ता व पुलावरील खड्डे बुजविण्यात आले नाहीत. यामुळे या बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आंतरराज्य मार्ग असल्यामुळे या रस्त्यावर जड वाहतूकही मोठ्या प्रमाणात आहे. वर्दळीचा रस्ता असल्यामुळे वाहनधारकांना या पुलावरून जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. सार्वजनिक बांधकाम विभागाचे या बांधकामावर नियंत्रण होते. त्या पश्चातही या पुलाची अवघ्या दोन वर्षांत दुरावस्था कशी झाली हा संशोधनाचा विषय आहे. याकडे लोकप्रतिनिधींचे ही कायम दुर्लक्ष दिसून येत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.

टॅग्स :National Highwayराष्ट्रीय महामार्गRainपाऊस