शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

तलावाच्या पाळीला भेगा

By admin | Updated: August 31, 2015 00:30 IST

तालुक्यातील मालुटोला येथील माजी मालगुजारी तलावाची पाळ अतिवृष्टीमुळे फुटण्याच्या तयारीत असताना गावकऱ्यांनी वेळीच त्या खड्ड्यााला रेतीच्या पोती टाकून बुजविला.

गावकऱ्यांनीच बुजविला खड्डा : मालुटोला येथील प्रकारसाकोली : तालुक्यातील मालुटोला येथील माजी मालगुजारी तलावाची पाळ अतिवृष्टीमुळे फुटण्याच्या तयारीत असताना गावकऱ्यांनी वेळीच त्या खड्ड्यााला रेतीच्या पोती टाकून बुजविला. अन्यथा तलावाची पाळ फुटून हजारो एकर शेतातील धान वाहून गेले असते. हाच तलाव २००६ ला फुटला होता. तरीही लघुपाटबंधारे विभागाचे या तलावाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे.२९ आॅगस्टला तालुक्यात अतिवृष्टीमुळे मालुटोला तलावात पाणीसाठा वाढला. तलावाच्या पाळीला एक मोठे भगदाड पडले. या भगदाडातुन पाणी धो-धो वाहत होते. हा प्रकार रात्रभर सुरु होता. या तलावातील लाखो लिटर पाणी वाया गेले. रात्र असल्यामुळे हा प्रकार गावकऱ्यांच्या लक्षात आला नाही.पहाटे मासेमार बांधव तलावाकडे गेले असता हा प्रकार दिसला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तलावाकडे धाव घेतली. तलावाच्या पाळीला पडलेल्या भगदाड बुजविण्यासाठी कंबर कसली, प्रशासनाच्या मदतीची अपेक्षा न करताच त्यांनी तात्काळ सिमेंटच्या खाली बॅग गोळा केल्या व त्यात रेती भरुन भगदाड बुजविणे सुरु केले. जवळपास चारशे ते पाचशे बॅग रेतीच्या टाकुन हा भगदाड बुजविला. या घटनेची माहिती मिळताच मंडळ अधिकारी निंबार्ते, लघु पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता ईखार हे आपल्या कर्मचाऱ्यासह पोहचले चिंता वाढली आहे. दिवसभर हे भगदाड बुझविण्याचे काम सुरुच होते. (तालुका प्रतिनिधी)२००६ ला फुटले होते याच तलावाचे वेस्टवेअरशासनाने तलावाच्या पाण्याची सोय शेतीच्या सिंचनासाठी व्हावा यासाठी या तलावाच्या पाळीला सन १९९५-९६ ला ८० मीटर लांब वेस्टवेअरची बांधणी केली. मात्र या वेस्टवेअरचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने हे वेस्टवेअर सप्टेंबर २००५ चा अतिवृष्टीने पूर्णपणे फुटले होते. त्यामुळे तलावातील पूर्ण पाणी वाया जाऊन शेकडो हेक्टरवर जमीनीतील पीक वाहून गेले होते. त्यावेळी लघुपाटबंधारे विभागाने या वेस्टवेअरची तात्पुरती डागडुगी केली होती. मात्र पुन्हा एकवर्षातच आॅगस्ट २००६ ला अतिवृष्टीत पुन्हा हा वेस्टवेअर फुटला होता. त्याहीवर्षी शेकडो हेक्टरमधील पीक वाहून गेल्याने शेतकऱ्यांना याचा फटका बसला होता.