शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

भंडारात काँग्रेसतर्फे रस्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 05:00 IST

काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांना धक्काबुक्की करुन अटक केल्याच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने येथील राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. या आंदोलनाने राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक अर्धा तास ठप्प झाली होती.

ठळक मुद्देराहुल गांधीना झालेल्या धक्काबुक्कीचा निषेध : राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक अर्धा तास ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : उत्तरप्रदेशातील हाथरस येथे पीडितेच्या परिवाराला भेटण्यासाठी जात असताना काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांना धक्काबुक्की करुन अटक केल्याच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने येथील राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. या आंदोलनाने राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक अर्धा तास ठप्प झाली होती.खासदार राहूल गांधी यांना धक्काबुक्की आणि अटक झाल्याची माहिती होताच काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहन पंचभाई आणि जिल्हा प्रभारी प्रफुल गुडधे यांच्या नेतृत्वात कार्यकर्ते एकत्र आले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय महामार्गावर दुपारी ४ वाजता ठिय्या देवून केंद्र सरकारच्या विरुध्द घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी प्रदेश महासचिव प्रमोद तितिरमारे, धनंजय तिरपुडे, शफी लद्दानी, अजय गडकरी, दिलीप मासुरकर, राकेश कारेमोरे, पवन वंजारी, कैलाश भगत, आवेश पटेल, सुरेश मेश्राम, राजकपूर राऊत, प्रमोद मानापूरे, गौरीशंकर मोटारे, सचिन घनमारे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.अचानक झालेल्या या आंदोलनामुळे पोलिसांची काही काळ भंबेरी उडाली. मात्र अवघ्या अर्ध्या तासात आंदोलकांची समजूत काढून रस्ता वाहतूकीसाठी मोकळा करण्यात आला. मात्र या आंदोलनाने तासभर वाहतूक विस्कळीत झाली होती. यानंतर आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.

टॅग्स :Morchaमोर्चा