शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

भारनियमनाचा फटका धानपिकाला

By admin | Updated: October 3, 2014 01:09 IST

भारनियमनामुळे सहा गावातील संपूर्ण धान पीक धोक्यात आले आहे. दोन दिवस धानाला पाणी मिळाले नाही तर पीके नष्ट होतील.

तुमसर : भारनियमनामुळे सहा गावातील संपूर्ण धान पीक धोक्यात आले आहे. दोन दिवस धानाला पाणी मिळाले नाही तर पीके नष्ट होतील. याविरोधात शेकडो शेतकऱ्यांनी उपकार्यकारी अभियंत्याला तुमसर येथील कार्यालयात घेराव करून ठिय्या आंदोलन करण्यात आले. सायंकाळपर्यंत आंदोलनकर्ते कार्यालयात बसून होते. उमरवाडा, नवरगाव, बोरी, कोष्टी, डोंगरला, बाम्हणी येथे १६ तास भारनियमन सुरु आहे. केवळ आठ तास वीज पुरवठा सुरु राहतो. त्यातही तांत्रिक बिघाड सुरुच आहे. बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास उपकार्यकारी अभियंत्यांना शेकडो शेतकऱ्यांनी घेराव केला. निदर्शने व नारेबाजी केली. उपकार्यकारी अभियंता गडपायले यांनी कार्यकारी अभियंता अमीत परांजपे व अधीक्षक अभियंता सतीश मेश्राम यांचेशी भ्रमणध्वनीवर संपर्क करून घेरावा संदर्भात माहिती दिली. परंतु त्यांनी ठोस आश्वासन दिले नाही. आदेशाची अंमलबजावणी शिवाय काहीच करता येत नाही असे उपकार्यकारी अभियंता गडपायले यांनी सांगितले. सायंकाळपर्यंत शेतकऱ्यांचा ठिय्या आंदोलन सुरू होते. कार्यालयातून बाहेर पडू देणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी घेतली. खासदारांनाही माहिती देण्यात आली. त्यांनी काय ते बघतो असे सांगितल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. तालुक्यातील विद्युत फिडरमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड येत असल्यामुळे याचा फटका जनसामान्यांना बसत आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात धान पिक घेत असताना भारनियमन का करण्यात येते याकडे बळीराजा वारंवार प्रश्न विचारत असला तरी लोकप्रतिनिधींसह सामान्य प्रशासनही लक्ष देत नाही. (तालुका प्रतिनिधी)