पत्नीचा जीव घेणाऱ्या भारतनेही तळ्यात दिला जीव; मुलांच्या डोक्यावरून आई-वडिलांचे छत्र हरपले

By गोपालकृष्ण मांडवकर | Published: August 30, 2023 04:19 PM2023-08-30T16:19:25+5:302023-08-30T16:21:55+5:30

बुधवारी सकाळी तलावात आढळला मृतदेह : एक दिवसापूर्वी पत्नीचा केला होता खून

Bharat who took the life of his wife commits suicide in the lake, body was found on wednesday morning | पत्नीचा जीव घेणाऱ्या भारतनेही तळ्यात दिला जीव; मुलांच्या डोक्यावरून आई-वडिलांचे छत्र हरपले

पत्नीचा जीव घेणाऱ्या भारतनेही तळ्यात दिला जीव; मुलांच्या डोक्यावरून आई-वडिलांचे छत्र हरपले

googlenewsNext

भंडारा : सर्वजण साखरझोपेत असताना मंगळवारी (२९ ऑगस्ट) भल्या पहाटे ४ वाजता पत्नीवर प्राणघातक हल्ला करून नंतर पसार झालेला पती भारत चाचेरे यानेही गावाजवळच्या तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. बुधवारी सकाळी गावकऱ्यांना त्याचे प्रेत तरंगताना दिसल्यावर हा प्रकार उघडकीस आला. 

लाखनी तालुक्यातील सेलोटी या गावातील भारती भारत चाचेरे (४०) आणि तिचा पती भारत (४५) यांच्यात मंगळवारी पहाटे वाद झाला होता. या वादामध्ये लाकडी पाट पत्नीच्या डोक्यात घातला होता. यामुळे खोलवर जखम झाल्याने रक्तबंबाळ होऊन ती बेशुद्ध होऊन पडली होती. मुले झोपून उठली तेव्हा त्यांना आई रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्धावस्थेत स्वयंपाकघरात पडलेली दिसली. शेजारी गोळा झाल्याचे पाहून सर्वांदेखत भारतने घरातून पळ काढला होता. त्याच्या तपासासाठी पोलिसांनी शोध सुरू केला होता.

सैतान संचारला, डोक्यात लाकडी पाट घालून ‘त्याने’ पत्नीलाच संपविले

दरम्यान, गावापासून एक किलोमीटर अंतरावरील चान्ना (धानला) या गावालगतच्या तलावात बुधवारी सकाळी ९ वाजताच्या दरम्यान गावकऱ्यांना कुण्या व्यक्तीचा मृतदेह तरंगताना आढळला. पोलिसांना याची माहिती मिळताच चौकशी केली असता तो भारत चाचेरेचा असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी प्रेत शवविच्छेदनासाठी पाठवून नंतर नातेवाईकांच्या ताब्यात दिले. 

दोन्ही मुले झाली अनाथ

या घटनेत आधी वडीलाने आईला संपविले. नंतर काही वेळातच स्वत:लाही संपविले. या दाम्पत्याला दोन मुले आहे. हे दोघेही आता अनाथ झाले आहेत. गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Bharat who took the life of his wife commits suicide in the lake, body was found on wednesday morning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.