Bhandara MLA Narendra Bhondekar corona positive | भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर कोरोना पॉझिटिव्ह

भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर कोरोना पॉझिटिव्ह


लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : येथील अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांना कोरोनाची लागण झाली असून रविवारी रात्री नागपूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
भंडारा जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीच्या काळात त्यांनी मदतीसाठी पुढाकार घेत पुरग्रस्त गावांना भेटी दिल्या होत्या. अशातच त्यांची प्रकृती बिघडली. त्यानंतर त्यांची तपासणी करण्यात आली असता ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे पुढे आले. रविवारी रात्री त्यांची प्रकृती खराब झाल्याने नागपूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी चाचणी करुन घ्यावी. कोरोनाच्या संकटकाळात न घाबरता फिजीकल डिस्टन्सिंग व मास्क घालून प्रत्येकांनी स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केली आहे.

Web Title: Bhandara MLA Narendra Bhondekar corona positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.