शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

‘बावनथडी’चा कालवा फोडला

By admin | Updated: July 12, 2014 23:29 IST

पावसाने दडी मारल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. शेतकरी बांधावर आणि नजरा आकाशाकडे लागलेल्या आहेत. पऱ्हे वाचविण्यासाठी बावनथडी प्रकल्पाने पाणी सोडले. परंतु काही शेतकऱ्यांनी कालवा

काटेबाम्हणीतील प्रकार : सभापतींसह चार शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल
तुमसर : पावसाने दडी मारल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. शेतकरी बांधावर आणि नजरा आकाशाकडे लागलेल्या आहेत. पऱ्हे वाचविण्यासाठी बावनथडी प्रकल्पाने पाणी सोडले. परंतु काही शेतकऱ्यांनी कालवा फोडून पाणी पळविल्यामुळे दुसऱ्या शेतकऱ्यांना पाणी मिळत नव्हते. त्यामुळे वंचित शेतकऱ्यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांकडे तक्रार केली.
आज शनिवारला, सकाळी १० वाजताच्या सुमारास उपविभागीय अभियंता व त्यांच्या भरारी पथकाने घटनास्थळी भेट दिल्यानंतर हा प्रकार उघडकीला आला. याप्रकरणी अधिकाऱ्यांनी तुमसर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यावरुन तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व अन्य चार शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहे.
तुमसर तालुक्यात २९,३०० हेक्टर क्षेत्रात भातशेती केली जाते. सद्यस्थितीत शेतकऱ्यांचे पऱ्हे पुर्णत: करपले आहे. बावनथडी प्रकल्पातून सध्या शेतकऱ्याच्या पऱ्ह्यांसाठी पाणी सोडणे सुरु आहे. खापाजवळील काटेबाम्हणी शिवारातून उजवा कालवा जातो. या कालव्याला ठिकठिकाणी फोडून त्यात जलवाहिन्या टाकून पाण्याची दिशा बदलविण्यात आली. मागील आठ ते दहा दिवसापासून नियमबाह्यरित्या शेतात नेणे सुरु होते. कालव्या फोडल्याने अनेक शेतकऱ्यांना पाणी मिळत नव्हते. याबाबत उपविभागीय अभियंत्यांना तक्रार करण्यात आली. उपविभागीय अभियंता निशिकांत पनके व त्यांच्या सहकाऱ्यांनी काटेबाम्हणी शिवारात भेट दिल्यावर हा प्रकार उघडकीस आला.
उपविभागीय अभियंता पनके यांनी कालवा फोडल्याप्रकरणी तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊराव तुमसरे व अन्य चार शेतकऱ्यांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. तुमसर पोलिसांनी भादंवि ४३०, ३४ कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे. कालव्याची नासधूस करणे, कालव्याचे नियमबाह्य पाणी वळविणे या गुन्ह्यांचा त्यात समावेश आहे.
कालव्याला ठिकठिकाणी फोडल्याने कालव्याचे मोठे नुकसान झाले असून समोर शेत असलेल्या शेतकऱ्यांना सध्या पाणी मिळणे बंद आहे. या प्रकरणाची प्रकल्प अधिकाऱ्यांनी दखल घेतली आहे. राजरोसपणे कालवा फोडून त्यात जलवाहिन्या टाकल्याने शेतात पाण्याचा अपव्यय होत असल्याचे दिसते. पुरावा व चौकशीअंती या प्रकरणात पाच वर्षाची शिक्षेची तरतूद असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे आरोपींचे धाबे दणाणले आहे. याघटनेचा तपास हवालदार के.सी. गिऱ्हीपुंजे करीत आहे. या प्रकरणात कोणती कारवाई होते, त्याकडे नागरिकांचे लक्ष लागलेले आहे. (तालुका प्रतिनिधी)