शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
3
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
4
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
5
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
6
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
7
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
8
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
9
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
10
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
11
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
12
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
13
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
14
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
15
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
16
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
17
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
18
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
19
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
20
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
Daily Top 2Weekly Top 5

तहसील कार्यालयावर ‘बैलबंडी मोर्चा’

By admin | Updated: November 6, 2014 22:50 IST

सततच्या नापिकीमुळे आधीच मोडकडीस आलेल्या शेतकऱ्यांना नवसंजिवनी मिळावी, त्यांना आर्थिक मदत मिळावी या अन्य मागण्यांसाठी बुधवारी दि. ५ नोव्हेंबर रोजी शेकडो शेतकऱ्यांनी शिवसेनेच्या

अड्याळ : सततच्या नापिकीमुळे आधीच मोडकडीस आलेल्या शेतकऱ्यांना नवसंजिवनी मिळावी, त्यांना आर्थिक मदत मिळावी या अन्य मागण्यांसाठी बुधवारी दि. ५ नोव्हेंबर रोजी शेकडो शेतकऱ्यांनी शिवसेनेच्या नेतृत्वात बैलबंडी मोर्चा काढून मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले. अड्याळ परिसरातील धान उत्पादक शेतकऱ्यांवर ओढावलेल्या दुष्काळजन्य परिस्थितीतून सावरण्यासाठी व त्याला आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलून तातडीने मदतीचा हात द्यावा व प्रत्येक शेतकऱ्यांना १०० टक्के नापिकीची घोषणा करून १०० टक्के नुकसान भरपाई तातडीने देण्यात यावी, कमी पावसामुळे करपलेल्या धानाची पाहणी करून शेतकऱ्यांना आर्थिक २२ हजार रुपये एकरी मदत देण्यात यावी, ज्या शेतकऱ्यांचे पीक गेले त्यांना शासनाकडून मोफत बियाणे देण्यात यावे, नेरला उपसा सिंचन योजना त्वरीत चालू करण्यात यावी, गावस्तरावर दुष्काळ जाहीर करून कर्जमाफी देण्यात यावी, ज्या शेतकऱ्यांकडे पंप आहे अशा शेतकऱ्यांचे विद्युत बील माफ करावे व भारनियमन बंद करण्यात यावे, अड्याळ परिसरात ३0 ते ३५ टक्के रोवण्या झाल्या नाहीत. त्यांचेही सर्व्हे करण्यात यावे अशा सर्व मागण्या घेऊन शिवसेनेच्या वतीने दुपारी १२ वाजता नायब तहसील कार्यालयावर बैलबंडी मोर्चा काढण्यात आला. यावेळी शिवसेना व परिसरातील शेतकऱ्यांनी नायब तहसीलदार वाकलेकर तसेच आ. अवसरे यांना निवेदन दिले. आ. अवसरे यांनी जिल्हाधिकारी यांच्या सोबत चर्चा करून शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी शिवसेना विभाग प्रमुख प्रकाश मानापुरे, तालुका अध्यक्ष विजय काटेखाये, राजेंद्र ब्राम्हणकर, गिरधर कोहपरे, निवृत्ती गभणे, भोजराज गभणे, मधुकर गभणे व परिसरातील हजारो शेतकरी उपस्थित होते. यावेळी एका शेतकऱ्याने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर झाँकी मोर्चा दरम्यान काढली होती. कायदा व सुव्यवस्था प्रस्तापित राखण्यासाठी ठाणेदार नेवारे यांनी चोख बंदोबस्त लावला होता. नायब तहसीलदारांना निवेदन सोपविल्यानंतर मोर्चाची रितसर सांगता करण्यात आली. (वार्ताहर)