चांदूपर येथील जागृत हनुमान मंदिर कुलूपबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 05:00 IST2020-04-09T05:00:00+5:302020-04-09T05:00:31+5:30

दरवर्षी हनुमान जयंतीला संपूर्ण विदर्भ, मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यातून सुमारे दोन ते अडीच लाख भाविक येथे येतात. हवन, भजन, कीर्तन व महाप्रसादाचे येथे आयोजन भक्तांकडून केले जातात. परंतु कोरोनाच्या महामारीत मंदिराच्या इतिहासात संपूर्ण मंदिरच कुलूपबंद करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला. मंदिरात केवळ पुजारी आहेत.

Awakened Hanuman Temple at Chandupar locked | चांदूपर येथील जागृत हनुमान मंदिर कुलूपबंद

चांदूपर येथील जागृत हनुमान मंदिर कुलूपबंद

ठळक मुद्देहनुमान जयंती दिनी शुकशुकाट : अडीच लाख भाविकांची राहायची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : कोरोनाच्या फैलाव होवू नये म्हणून चांदूपर येथील प्रसिद्ध हनुमान मंदिर कुलूपबंद करण्यात आले आहे. मंदिराच्या इतिहासात हनुमान जयंतीला येथे शुकशुकाट होता. दरवर्षी सुमारे दोन ते अडीच लाख भाविकांची येथे गर्दी राहत होती.
पूर्व विदर्भात तुमसर तालुक्यात चांदपूर येथे प्रसिद्ध हनुमान मंदिर आहे. बुधवारी हनुमान जयंतीला येथे शुकशुकाट होता. मंदिराचा मुख्य मार्ग लॉकडाऊन करण्यात आले. कोरोनाच्या प्रादूर्भाव होऊ नये म्हणून शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन येथे करण्यात येत आहे.
दरवर्षी हनुमान जयंतीला संपूर्ण विदर्भ, मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यातून सुमारे दोन ते अडीच लाख भाविक येथे येतात. हवन, भजन, कीर्तन व महाप्रसादाचे येथे आयोजन भक्तांकडून केले जातात. परंतु कोरोनाच्या महामारीत मंदिराच्या इतिहासात संपूर्ण मंदिरच कुलूपबंद करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला. मंदिरात केवळ पुजारी आहेत. मंदिरात कुणालाच प्रवेश देण्यात येत नाही, अशी माहिती पूजारी मनोहर शुक्ला यांनी दिली. सातपुडा पर्वत रांगात उंच टेकडीवर चांदपूर येथे हनुमान मंदिर आहे. या मंदिरात अनेक मान्यवरांनी हनुमंताचे दर्शन घेतले आहे.
 

Web Title: Awakened Hanuman Temple at Chandupar locked