नुकसानभरपाईसाठी पीकविमा कंपन्यांची टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:37 IST2021-05-07T04:37:36+5:302021-05-07T04:37:36+5:30

खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीने लाखनी, लाखांदूर, भंडारा, तुमसर, पवनी तालुक्यांना मोठा फटका बसला होता. यामध्ये ३८ हजार ९२१ शेतकऱ्यांचे ...

Avoiding crop insurance companies for compensation | नुकसानभरपाईसाठी पीकविमा कंपन्यांची टाळाटाळ

नुकसानभरपाईसाठी पीकविमा कंपन्यांची टाळाटाळ

खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीने लाखनी, लाखांदूर, भंडारा, तुमसर, पवनी तालुक्यांना मोठा फटका बसला होता. यामध्ये ३८ हजार ९२१ शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. यात २६ हजार ८१२ हेक्टर पिकांचे नुकसान झाले होते. त्यानंतर राज्य शासनाने शेतकऱ्यांची दखल घेऊन सात कोटी ४२ लाख रुपयांची जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत दिली होती. मात्र, खरीप हंगामात एक लाख ८३ हजार ४०१ शेतकरी पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभागी होऊनही अद्याप यातील हजारो शेतकऱ्यांना पीकविमा कंपन्यांकडून मदत मिळालीच नसल्याचे वास्तव आहे. सहा महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही मदतीसाठी पीकविमा कंपन्यांनी हात वर केले असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. एकीकडे पीककर्ज भरण्याची शेतकऱ्यांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे, तर दुसरीकडे अद्यापही विमा कंपन्यांकडून मदत मिळाली नाही अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडले आहेत.

कोट

धान पीक कापणीला येताच तुडतुडा रोगाने आक्रमण केले. यात तीन एकरांतील धान जागेवरच नष्ट झाले. त्यानंतर कृषी साहाय्यक, तलाठी, विमा प्रतिनिधीने येऊन पाहणी केली. मात्र, आता विमा प्रतिनिधीला फोन केला तरी अद्याप मला मदत मिळाली नाही. प्रशासनाने लक्ष घालून मला न्याय द्यावा.

सुरेश गिरीपुंजे,

शेतकरी, खरबी नाका

Web Title: Avoiding crop insurance companies for compensation