शहरं
Join us  
Trending Stories
1
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
2
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
3
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
4
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
5
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
6
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
7
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
8
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
9
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
10
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
11
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
12
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
13
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
14
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
15
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
16
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
17
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
18
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
19
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
20
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

लाखनी तहसील प्रशासनाकडून १६० व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 05:00 IST

गरीब व गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. स्थानिक समाजसेवी संस्था व सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने तालुक्यातील प्रत्येक गावातील गरजवंत लोकांपर्यंत पोहचवून तलाठ्यांमार्फत अन्नधान्य व आवश्यक साहित्याचे वितरण घरापर्यंत करण्यात आले.

ठळक मुद्देसर्वधर्मीयांची धाव : सोशल डिस्टन्सिंगचे पालन

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : तालुक्यात लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर तहसील कार्यालयातील आपत्ती व्यवस्था कक्षातर्फे गरीब व गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. स्थानिक समाजसेवी संस्था व सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने तालुक्यातील प्रत्येक गावातील गरजवंत लोकांपर्यंत पोहचवून तलाठ्यांमार्फत अन्नधान्य व आवश्यक साहित्याचे वितरण घरापर्यंत करण्यात आले.
१० एप्रिलपर्यंत १६० व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला. राशन कार्ड नसलेले, निराधार, अपंग, गरीब व गरजू लोक उपाशी राहणार नाही याची काळजी घेण्यात आली. तालुक्यातील राईस मिल असोशिएशन तर्फे प्रत्येक व्यक्तीला १० किलो तांदूळ, परमपूज्य सिंधी पंचायत गुरुद्वारा लाखनी तर्फे आटा, तूरडाळ, तेल, साखर, बिस्कीटे, कच्ची मेमन समाज मुस्लिम मंडळ लाखनी द्वारे मीठ, मिरची, हळद, मसाला, उदबत्ती, साबून, चहापत्ती आदी जिन्नस देण्यात आले. तालुक्यातील अधिकाऱ्यांकडून मोमबत्ती, अगरबत्ती, कंगवा, पेस्ट, कापड, बर्तन आदी साहित्य देण्यात आले. स्थानिक शेल्टर होम व गरजू लोकांना जेवण, चहा, नाश्ता सिंधी समाजातर्फे पुरविण्यात येत आहे. तहसीलदार मल्लीक विराणी यांच्या नेतृत्वात आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे समन्वयक नरेश नवखरे यांचे सहकार्याने तालुक्यातील महसूल विभाग, पंचायत समिती लाखनी नगरपंचायतचे सर्व कर्मचाऱ्यांनी तसेच लाखनीतील उदार मनाने सहकार्य व मदत करणाºया लोकांमुळे तालुक्यातील प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत मदत घेऊन तालुका प्रशासनाला पोहचता येत आहे.

लाखनीतील सर्वधर्मसमभावाचे ब्रिद जोपासणाऱ्या  उदार, दातृत्व व्यक्तीमुळे प्रत्येकाला मदत करता आली आहे. एकीचे बळ जगण्याचे सामर्थ्य निर्माण करून देत आहे. कोरोनामुक्तीचा संघर्ष सुरु असताना मदतीचा हात पुढे करणाºया संस्था व व्यक्तींना बघून तेथे कर माझे जुळती असे म्हणावे वाटते.
-मल्लीक विराणी, तहसीलदार, लाखनी.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या