शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

आस्थेने चौकशी करुन दिली सन्मानाची वागणूक

By admin | Updated: September 9, 2014 00:09 IST

एरव्ही अधिकारी कामाचे काय तेवढे बोला एवढं बोलतात. काम करून, नाही करून मोकळे होतात. परंतु मोहाडी तहसील कार्यालयात वेगळाच अनुभव दृष्टीस पडला. कुटुंबप्रमुखांना गमावलेल्या महिलांना

औचित्य धनादेश वाटपाचे : प्रकरण निराधार योजनेच्या मानधनाचे मोहाडी : एरव्ही अधिकारी कामाचे काय तेवढे बोला एवढं बोलतात. काम करून, नाही करून मोकळे होतात. परंतु मोहाडी तहसील कार्यालयात वेगळाच अनुभव दृष्टीस पडला. कुटुंबप्रमुखांना गमावलेल्या महिलांना तहसीलदार कल्याण डहाट यांनी सन्मानाने बसविले. आस्थेने विचारपूस केली. एवढंच नाही तर त्यांना चहा पाजून आपल्या सहृदयतेचा परिचय दिला.औचित्य होते, मोहाडी तहसील कार्यालयात राष्ट्रीय सामाजिक, कौटुंबिक अर्थसहाय्य योजनेद्वारे विधवा महिलांना धनादेश वाटपाचा. शनिवारी तलाठ्यांमार्फत धनादेश स्वीकारण्यासाठी आधार गेलेल्या महिलांना तहसील कार्यालयात बोलावण्यात आले होते. तहसील कार्यालयाच्या त्या महिला तहसीलदार यांची प्रतिक्षा करीत पडवीत बसून होत्या. फावल्या वेळात एकमेकांच्या दु:खाची वाटणी करीत होत्या. एक महिला आपलं तान्ह बाळ घेऊन मिळणाऱ्या अर्थसहाय्यासाठी आपली होती. विविध गावातून त्या विधवा ताटकळत बसून होत्या. त्यांची प्रतीक्षा संपली. एकाच वेळी आमदार अन् तहसीलदार आले. साहेब आल्याने विधवांच्या चेहऱ्यावरची निराशा गेली होती. तहसीलदारांनी लगेच त्या महिलांना दालनात बोलावले. त्यांना बसायला खुर्च्या दिल्या. अन् सरळ त्या निराधार महिलांनी तहसीलदारांनी संवाद साधला. एजंटामार्फत तुम्हाला सांगण्यात आलं का, कुणी पैसे मागितले का, याची चौकशी केली. संजय गांधी निराधार योजनेतून अर्थसहाय्य तुम्हाला मिळतं का अशीही विचारणा केली. पण उपस्थित असणाऱ्या अठरा महिलांपैकी एकीलाही संजय गांधी निराधार योजनेतून अर्थसहाय्य मिळत नसल्याचे लक्षात आले. कुटुंब प्रमुख अध्यापेक्षा जास्त आम आदमी विमा काढला गेला नाही. एक अधिकारी जनतेला विविध योजनेचा लाभ कसा मिळेल यासाठी धडपडतोय. पण महसूल विभागातील कणा असलेले तलाठी मात्र शासकीय योजना गरीबांपर्यंत कशी जाईल याची किंचीतही पर्वा करीत नसल्याचे लक्षात आले. एका लाभार्थ्यांचे २००९ पासून अर्थसहाय्य योजनेसाठी फार्म तलाठ्यांकडून तहसील कार्यालयात पाठविण्यात आला. पण आज पर्यंत तो फार्म मंजूर - नामंजूर याचा सोक्षमोक्ष लागला नसल्याचे निदर्शनास आले. त्या शिवाय अनेक संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, वृद्धापकाळ योजनेचे बरेच फॉर्म अडगळीत पडल्याचे तसेच गहाळ झाल्याचे तहसीलदार यांच्या निर्दशनास आणून देण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)