शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

खुटसावरीत पाण्याची कृत्रिम टंचाई

By admin | Updated: June 4, 2016 00:20 IST

तालुक्यातील खुटसावरी येथील नळधारकांना होणारा पाणीपुरवठा सुरळीत असताना अचानक पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रात बिघाड आला.

भंडारा : तालुक्यातील खुटसावरी येथील नळधारकांना होणारा पाणीपुरवठा सुरळीत असताना अचानक पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रात बिघाड आला. त्यामुळे गुरुवारपासून खुटसावरी वासीयांना पाण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. जवळपास १,२०० लोकसंख्येच्या या गावात पाणीपुरवठा योजना कार्यरत आहे. येथील ग्रामपंचायत शेजारी असलेल्या बोअरवेलमधील पाणी जलकुंभात जात असते. या जलकुंभातून नळधारकांना पाणीपुरवठा केला जात आहे. गत सात वर्षांपासून येथील नळधारकांना दिवसातून दोनदा पाणीपुरवठा केला जातो. परिसरातील गावांमध्ये पाणीटंचाई असली तरी खुटसावरीवासीयांना पाणीपुरवठा मात्र सुरळीत केला जातो. गावात जलस्त्रोताचे अनेक साधने आहे. यावर्षीच्या उन्हाळ्यात पाणी पुरवठा करणारी बोअरवेल वगळता बहुतांश जलस्त्रोतातील जलसाठा अल्प आहे. अनेक विहिरी व बोरवेलमधील पाण्याची पातळी खालावली आहे. सात वर्षापुर्वी गावात नळयोजना नव्हती. तेव्हा प्रत्येक घरी विहिरीतून पाणी काढण्यासाठी बादली असायची. मात्र गत सात वर्षापासून गावातील पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून खुटसावरीतील अनेक कुटूंबांना नळयोजनेव्दारे मुबलक पाणी दिले जात आहे. मात्र, गुरुवारला पाणीपुरवठा करणाऱ्या बोरवेलमध्ये बिघाड आला. त्यामुळे गावकऱ्यावंर पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ आली आहे. दरम्यान गावात सुस्थितीत असलेल्या एकदोन हातपंपावर पाण्यासाठी महिलांची गर्दी वाढली असून तंटे सुरू झाले आहेत. बोअरवेलवरील गर्दी पाहून अनेक नागरीक दोन, तीन किमी अंतरावर असलेल्या शेतातील स्त्रोतातून बैलबंडीने पाण्याची वाहतूक करीत आहे. आज सकाळपासून महिलांसह बालगोपाल पाण्यासाठी शेतातील विहिरींकडे धाव घेत होत. (नगर प्रतिनिधी)