पावसाच्या आगमनाने बळीराजाला दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 05:00 AM2020-07-08T05:00:00+5:302020-07-08T05:01:00+5:30

सात जूनला मृग नक्षत्र लागताच अनेक शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामाला सुरुवात केली होती. अधून-मधून हलक्या स्वरुपाच्या पावसाच्या सरी बरसल्या. परंतु तलाव, बोड्यांमध्ये आतापर्यंत पाणीसाठा झालेला नव्हता. त्यामुळे अनेक शेतकरी शेताची नांगरणी करुन रोवणीसाठी दमदार पावसाची वाट बघत होते. मृग नाही तर आर्द्र नक्षत्र नक्की पाऊस आणतो अशी शेतकऱ्यांची मान्यता असून त्या अंदाजाने शेती कार्य केले जातात.

The arrival of rain brought relief to Baliraja | पावसाच्या आगमनाने बळीराजाला दिलासा

पावसाच्या आगमनाने बळीराजाला दिलासा

Next
ठळक मुद्देतलाव, बोड्यांमध्ये साचले पाणी : रोवणीच्या कामाला येणार वेग

लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : पूर्ण जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्याची सुरुवात सुद्धा पावसाच्या आगमनाने झाली नव्हती. मात्र आषाढी पोर्णिमा संपताच पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. पुढे एक दोन दिवस असाच पाऊस झाल्यास तालुक्यात सर्वत्र रोवणीला सुरुवात होऊ शकते.
सात जूनला मृग नक्षत्र लागताच अनेक शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामाला सुरुवात केली होती. अधून-मधून हलक्या स्वरुपाच्या पावसाच्या सरी बरसल्या. परंतु तलाव, बोड्यांमध्ये आतापर्यंत पाणीसाठा झालेला नव्हता. त्यामुळे अनेक शेतकरी शेताची नांगरणी करुन रोवणीसाठी दमदार पावसाची वाट बघत होते. मृग नाही तर आर्द्र नक्षत्र नक्की पाऊस आणतो अशी शेतकऱ्यांची मान्यता असून त्या अंदाजाने शेती कार्य केले जातात. परंतु यंदा आर्द्र नक्षत्र सुद्धा जवळपास कोरडा गेला. त्यामुळे शेतकरी चिंतेत पडला होता. दरम्यान पावसाअभावी शेतातील पऱ्हे वाळण्याच्या मार्गावर होते. सोमवारी झालेल्या पावसाने शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.

उंदिराने केली परतफेड
यंदा मृग नक्षत्राच्या सुरुवातीला पावसाचे वाहन म्हैस होते. म्हशीला पाण्याची गरज असते. परंतु तरी सुद्धा या वाहनाने पावसाला आवाहन केले नाही असे वाटले. त्यानंतर पावसाचे वाहन घोडा बनला. नंतर लगेच आर्द्र नक्षत्राला सुरुवात झाली. घोडा हा तेज धावण्यासाठी ओळखला जातो. त्यानुसार धावत्या वेगाने पाऊस पडण्याची शक्यता होती. परंतु घोड्याचा पावसाशी व शेतीशी तेवढा संबंध येत नाही. म्हणून त्यानेही पावसाचे आवाहन केले नसावे. आषाढी पोर्णिमेच्या दिवशी पावसाचे वाहन उंदिर बनले. उंदिराने यावर्षी शेतकऱ्यांच्या शेतीतून भरपूर अन्न ग्रहण केले. शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. कदाचित त्याचीच परतफेड करण्यासाठी दमदार पाऊस बसरत आहे.

Web Title: The arrival of rain brought relief to Baliraja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस