शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

आठ विद्यार्थ्यांना सहा लाख रुपयाचे अर्थसहाय्य मंजूर

By admin | Updated: February 28, 2016 00:57 IST

विविध घटनांमध्ये मृत पावलेल्या आठ विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रत्येकी ७५ हजार याप्रमाणे एकूण सहा लाख रुपयांचे ...

मदतीची घोषणा : अपघात सानुग्रह अनुदान योजना भंडारा : विविध घटनांमध्ये मृत पावलेल्या आठ विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रत्येकी ७५ हजार याप्रमाणे एकूण सहा लाख रुपयांचे अर्थसहाय्य जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी राजीव गांधी विद्यार्थी सानुग्रह अनुदान योजनेद्वारे मंजूर केले. यामध्ये जिल्हा परिषद पुर्व माध्यमिक शाळा आंबागड ता. तुमसर येथील चौथ्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी सानिया ठाकरे हिचा वाहन पडून मृत्यू झाला. तुळशीरामजी तितीरमारे हायस्कुल आंबागड ता. तुमसर येथील आठव्या वर्गात शिकणारा राजकुमार टेकाम याचा अपघाताने मृत्यू, याच शाळेतील १० व्या वर्गात शिकणारा विद्यार्थी सुनील वाढवे याचा अपघाताने मृत्यू, ममता पूर्व माध्यमिक शाळा येरली ता. तुमसर येथील ५ व्या वर्गात शिकणारा विद्यार्थी विशाल पटले याचा अपघाताने मृत्यू, जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा सेलोटी ता. लाखनी येथील ५ व्या वर्गात शिकणारा विद्यार्थी कृपाल फसाटे याचा वाहन अपघाताने च, तिरुपती विद्यालय माडगी टेकेपार ता. भंडारा येथील १२ व्या वर्गात शिकणारा विद्यार्थी अविनाश नागापुरे याचा साप चावल्याने मृत्यू, तुळशीरामजी तितीरमारे हायस्कूल आंबागड ता. तुमसर येथील नवव्या वर्गातील विद्यार्थी अक्षय मेश्राम याचा वाहन अपघाताने मृत्यू, प्रकाश हायस्कूल अडयाळ ता. पवनी येथील ११ व्या वगार्तील हर्षल बोदलकर याचा वाहन अपघाताने मृत्यू झालेल्या या आठ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. अपघातामध्ये मृत्यू पावलेल्या विद्यार्थ्यांच्या शाळांच्या मुख्याध्यापकांनी आठ दाव्यांकरिता राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेद्वारे अर्थ सहाय्य मिळण्यासाठी दावे दाखल केले होते. या प्रस्तावांवर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अपघातामध्ये मृत पावलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रत्येकी ७५ हजार रुपये प्रमाणे एकूण ६ लाख रुपयांचे अर्थ सहाय्य मंजूर केले. (नगर प्रतिनिधी)