शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 06:00 IST

गत पाच वर्षात आमदारकीची धुरा सांभाळताना अनेकांना विविध योजनेचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र बरेचशे नागरिक शासनाच्या योजनेपासून वंचित राहिल्याचे प्रत्यक्ष पाहिले आहे. त्यामुळे आज जरी आमदार नसलो तरी माझ्या हातून जनतेची सेवा व्हावी यासाठी सदर उपक्रम राबवित असल्याचे माजी आमदार चरण वाघमारे यांनी सांगितले.

ठळक मुद्देसंडे अँकर । मोहाडी येथे लाभार्थी विकास केंद्राचे उद्घाटन, चरण वाघमारे यांचे मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : केंद्र सरकार व राज्य शासन यांच्यामार्फत अनेक कल्याणकारी योजनांची घोषणा होत असते, जरी शासनाद्वारे योजना जाहीर होत असली तरी प्रत्यक्षात मात्र त्या योजनांची अंमलबजावणी होत नाही, अशा योजनेपासून सुशिक्षित बेरोजगार, कामगार, शेतमजूर, अपंग, विधवा आदी वंचीत राहत असल्याचे निदर्शनास येत आहे. विकास फाऊंडेशनमार्फत लाभार्थी विकास केंद्र उघडले आहे. या केंद्रामार्फत शासकीय योजनाचा लाभ घ्यावा , असे आवाहन विकास फाऊंडेशनचे संस्थापक तथा माजी आमदार चरण वाघमारे यांनी केले.मोहाडी येथे लाभार्थी विकास केंद्राच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. उद्घाटन म्हाडा सभापती तारिक कुरेशी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विकास फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष डॉ. युवराज जमईवार, सभापती विशाखा बांडेबुचे, उपसभापती उमेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य चंदू ढेंगे, विकास फाऊंडेशनचे तालुकाध्यक्ष हंसराज आगाशे, पंचायत समिती सदस्य हरिचंद बंधाटे, निशा कळंबे, जगदीश ऊके, सुनील मेश्राम, सतीश इटनकर, नगरसेवक सेवक चिंधालोरे, रवी देशमुख, मनीषा साठवणे, यादोराव कुंभारे, भूषण गभणे, जगदीश शेंडे, निशा पशिने, रीता भाजीपाले, निखिल खोब्रागडे उपस्थित होते. यावेळी लाभार्थ्यांना योजनांचे माहितीपत्रक देण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन सेवक चिंधालोरे यांनीे, तर आभार प्रदर्शन देवेंद्र मलेवार यांनी मानले. कार्यक्रमाला मोहाडी, तुमसर तालुक्यातील अनेक लाभार्थी उपस्थित होते.वंचितांसाठी पुढाकारगत पाच वर्षात आमदारकीची धुरा सांभाळताना अनेकांना विविध योजनेचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र बरेचशे नागरिक शासनाच्या योजनेपासून वंचित राहिल्याचे प्रत्यक्ष पाहिले आहे. त्यामुळे आज जरी आमदार नसलो तरी माझ्या हातून जनतेची सेवा व्हावी यासाठी सदर उपक्रम राबवित असल्याचे माजी आमदार चरण वाघमारे यांनी सांगितले.लाभार्थ्यांना त्रास नकोकेंद्र सरकार व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ मिळविण्यासाठी कोणत्या योजनेच्या लाभाकरीता, कोणती कागदपत्रे व कोणत्या कार्यालयात अर्जासोबत सादर करावी, याची माहिती सहजरित्या लाभार्थ्यांना मिळावी, हा उदात्त हेतू ठेवून विकास लाभार्थी केंद्राचा शुभारंभ मोहाडी येथे करण्यात आला आहे.

टॅग्स :government schemeसरकारी योजना