सर्व अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या उत्थानाचे ध्येय बाळगावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 06:00 AM2019-12-30T06:00:00+5:302019-12-30T06:00:29+5:30

यावेळी नाना पटोले यांनी लाखांदूर तालुक्यातील बांधकाम, शिक्षण, कृषी, लघुपाटबंधारे, आरोग्य , विद्युत व पोलीस विभागासह परिवहन विभागाचीदेखील माहिती घेतली. दरम्यान, सबंधित विभागाअंतर्गत माहिती घेत असतांना प्रामुख्याने शेतकरी व गोरगरीब जनतेसह विद्यार्थ्यांना परिवहन सेवा तत्काळ उपलब्ध करण्याचे निर्देश दिले.

All officers should aim for the upliftment of the farmers | सर्व अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या उत्थानाचे ध्येय बाळगावे

सर्व अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या उत्थानाचे ध्येय बाळगावे

Next
ठळक मुद्देनाना पटोले : लाखांदूर पंचायत समितीत आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : आरोग्य, शिक्षण, वीज आदी क्षेत्रांत शेतकरी कुठेही कमी पडता कामा नये, यासाठी कृषी विभागासह सर्व विभागांनी शेतकऱ्यांच्या उत्थानाचे ध्येय बाळगावे, असे आवाहन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.
लाखांदूर पंचायत समितीमध्ये शनिवारी आयोजीत आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला भंडारा जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, जिल्हा परिषद सदस्य प्रणाली ठाकरे, शुद्धमता नंदागवळी, प्रदिप बुराडे, मनोहर राऊत, सभापती मंगला बगमारे, गटविकास अधिकारी करंजेकर यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थीत होते.
यावेळी नाना पटोले यांनी लाखांदूर तालुक्यातील बांधकाम, शिक्षण, कृषी, लघुपाटबंधारे, आरोग्य , विद्युत व पोलीस विभागासह परिवहन विभागाचीदेखील माहिती घेतली. दरम्यान, सबंधित विभागाअंतर्गत माहिती घेत असतांना प्रामुख्याने शेतकरी व गोरगरीब जनतेसह विद्यार्थ्यांना परिवहन सेवा तत्काळ उपलब्ध करण्याचे निर्देश दिले. घरकुल लाभार्थ्यांना बांधकामाच्या प्रगतीपथानुसार धनादेश देण्यास कुणी अभियंत्यांनी कामात हयगय न करता परवानगी समन्वयातून गोरगरीब जनतेचे हित साधले पाहिजे. दरम्यान, घरकुल लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी पाच ब्रॉस रेती मोफत देण्याची तरतुद केली असतांना महसूल विभागाअंतर्गत विनापरवाना रेती वाहतुकीच्या नावाखाली लाखोंचा भुर्दंड वसुल केला जात असल्याच्या अनेक तक्रारी जनतेकडुन प्राप्त झाल्याचे देखील सांगितले. यावर्षी ईटीयाडोह धरणात पुरेसा जलसाठा उपलब्ध असल्याने तालुक्यातील उन्हाळी धान ऊत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे सांगितले. संचालन व आभार प्रदर्शन गटशिक्षणाधिकारी तत्वराज अंबादे यांनी केले.

Web Title: All officers should aim for the upliftment of the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.