जिल्ह्यातील सर्वच्या सर्व ७९ नमुने निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 05:00 IST2020-04-11T05:00:00+5:302020-04-11T05:00:57+5:30

भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातून आतापर्यंत ७९ संशयीत व्यक्तींचे नमुने नागपूर येथील मेयो रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. बुधवारपर्यंत ७२ व्यक्तींचे अहवाल प्राप्त होवून सर्वच्या सर्व निगेटिव्ह आले होते. केवळ सात अहवालाची सर्वांना प्रतीक्षा होती. दरम्यान शुक्रवारी सातही नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामुळे ७९ पैकी ७९ नमुने निगेटिव्ह आले. जिल्ह्यात कुठेही कोरोनाबाधित रुग्ण आढळनू आला नाही.

All 79 samples in the district are negative | जिल्ह्यातील सर्वच्या सर्व ७९ नमुने निगेटिव्ह

जिल्ह्यातील सर्वच्या सर्व ७९ नमुने निगेटिव्ह

ठळक मुद्देनागरिकांना दिलासा : आयसोलेशन वॉर्डातून आतापर्यंत १८ जणांना सुटी

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोरोना संशयितांचे तपासणीसाठी पाठविलेले सर्वच्या सर्व ७९ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले असून प्रशासनासह नागरिकांनीही सुटकेचा निश्वास घेतला आहे. राज्यात कोरोनाने थैमान घातले असताना जिल्ह्यात सुदैवाने अद्याप एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही. जिल्हास्तरावर प्रतिबंधासाठी युद्धस्तरावर उपाययोजना केल्या जात असून प्रशासन आणि वैद्यकीय पथक अहोरात्र मेहनत घेत आहेत.
भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातून आतापर्यंत ७९ संशयीत व्यक्तींचे नमुने नागपूर येथील मेयो रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. बुधवारपर्यंत ७२ व्यक्तींचे अहवाल प्राप्त होवून सर्वच्या सर्व निगेटिव्ह आले होते. केवळ सात अहवालाची सर्वांना प्रतीक्षा होती. दरम्यान शुक्रवारी सातही नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामुळे ७९ पैकी ७९ नमुने निगेटिव्ह आले. जिल्ह्यात कुठेही कोरोनाबाधित रुग्ण आढळनू आला नाही.
जिल्ह्यात १८ हजार ८५८ व्यक्ती महानगरातून दाखल झाले असून त्या सर्वांचे गृह अलगीकरण करण्यात आले आहे. सध्या नर्सिंग वसतीगृहाच्या अलगीकरण कक्षात सहा व्यक्ती दाखल आहे. तर आतापर्यंत ५७ जणांना सुटी देण्यात आली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डात नऊ व्यक्ती दाखल आहेत.

जिल्हा रुग्णालयाला अशोक लेलँडकडून मदत
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाला गडेगावच्या अशोक लेलँड कंपनीने मदतीचा हात दिला. अशोक लेलँडतर्फे ट्रिपल लेअर माक्स १०० नग, हॅन्ड सॅनिटायझर पाच लीटर, एन-९५ माक्स २० नग, कोविड-१९ पीपीई कीट २०, हॅन्डग्लोज २०० नग आणि सर्जिकल कॅप २०० नग साहित्याचा पुरवठा करण्यात आला. अशोक लेलँडचे प्लॅन्ट हेड एम.एन. नखाते, मानव संसाधन विकास प्रमुख अरविंद बोरडक, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोहर कांबळे यांनी ही मदत जिल्हा रुग्णालयाच्या सुपूर्द केली.

घरोघरी सर्व्हेक्षण
कारोना संसर्गाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी विविध उपाय योजना केली जात असून त्याअंतर्गत गाव पातळीवर घरोघरी सर्व्हेक्षणाचे काम केले जात आहे. आशा व अंगणवाडी सेविकांमार्फत गृहभेटी देवून सर्वांची माहिती गोळा केली जात आहे. महानगरातून आलेल्या व्यक्तींवरही लक्ष ठेवले जात असून होम क्वारंटाईन व्यक्तींना मार्गदर्शन करण्यात येत आहे.

Web Title: All 79 samples in the district are negative