लसीकरणानंतर काही दिवस मद्यपान टाळायलाच हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 05:00 AM2021-04-10T05:00:00+5:302021-04-10T05:00:49+5:30

जिल्ह्यात सध्या ४५ वर्षांवरील नागरिकांना कोरोना लस देण्याचे काम सुरू आहे. अनेक ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी नागरिक स्वेच्छेने गर्दी करीत आहेत.  मात्र मद्यप्राशना संदर्भात संभ्रमावस्था असल्याचे चित्र आहे. लस घेतल्यानंतर किती दिवसांनंतर मद्यपान करावे, लसीकरण व मद्यपान याचा फारसा संबंध नाही, तसेच या संदर्भात ठोस अशा मार्गदर्शक सूचना नसल्याचेही अनेकांनी सांगितले.

Alcohol should be avoided for a few days after vaccination | लसीकरणानंतर काही दिवस मद्यपान टाळायलाच हवे

लसीकरणानंतर काही दिवस मद्यपान टाळायलाच हवे

Next
ठळक मुद्देलस आणि मद्यपानाच्या बाबत वाढले गैरसमज

लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी  जिल्हा प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार १५ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे मात्र लसीकरणापूर्वी किती दिवस आणि लसीकरणानंतर किती दिवस मद्यपान करायचे का नाही याबाबत मात्र भंंडाऱ्यामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते आपल्या रोगप्रतिकारक क्षमतेला मद्यपान मारक ठरत असल्याने मद्यपान करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. याशिवाय मद्यपान केल्याने अनेक विविध प्रकारचे आजारही जडू शकतात. त्यामुळे मद्यपान किंवा त्याचे अतिसेवन कोरोना लसीकरणापूर्वी आणि लसीकरणानंतरही टाळणे चांगले असल्याचे डॉक्टरांकडून सांगितले जात आहे. 
जिल्ह्यात सध्या ४५ वर्षांवरील नागरिकांना कोरोना लस देण्याचे काम सुरू आहे. अनेक ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी नागरिक स्वेच्छेने गर्दी करीत आहेत.  मात्र मद्यप्राशना संदर्भात संभ्रमावस्था असल्याचे चित्र आहे. लस घेतल्यानंतर किती दिवसांनंतर मद्यपान करावे, लसीकरण व मद्यपान याचा फारसा संबंध नाही, तसेच या संदर्भात ठोस अशा मार्गदर्शक सूचना नसल्याचेही अनेकांनी सांगितले. मात्र मद्यसेवनाचे शरीरावर विपरीत परिणाम होतात. यामुळे कोरोना परिस्थितीत तरी अनेकांनी मद्यपान टाळणे आवश्यक असल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोना लसीकरणामुळे रोगप्रतिकार क्षमता निर्माण होणे गरजेचे आहे.

मद्यप्राशन हानिकारकच 
मद्यसेवन अथवा कोणतेही मानवाला असलेले व्यसन हे आरोग्याच्या दृष्टीने घातकच असते. अनेक जण कॉलेज वयात मित्रांच्या आग्रहाखातर किंवा शौक अथवा आकर्षण म्हणून मद्यसेवन करतात. मात्र कालांतराने हीच सवय जडली जाते.

शासनाच्या काेणत्याही मार्गदर्शक सूचना नाही

कोरोना लसीकरणानंतर मद्यपान करावे अथवा करू नये याबाबत शासनाच्या कोणत्याही मार्गदर्शक सूचना अथवा आदेश नाहीत. मात्र मानवी आरोग्याच्या दृष्टीने विचार केल्यास मद्यपान किंवा मद्याचे अतिसेवन आरोग्याच्या दृष्टीने हानिकारकच आहे. प्रत्येकानेच आपल्या आरोग्याची काळजी घेऊन कोरोना उपाययोजनांचे पालन करण्याची गरज आहे.
- डॉ. प्रशांत उईके, जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद, भंडारा

मद्यसेवन तसेही आराेग्याच्या दृष्टीने हानीकारक असते. काेराेना लस घेतल्यानंतर साधारण दाेन महिने मद्यप्राशन करु नये. लसीकरणानंतर मद्यप्राशन केल्यास लसीचा हवा तेवढा प्रभाव हाेणार नाही. त्यासाठी लस घेणाऱ्या व्यक्तींनी मद्यप्राशन टाळणे गरजेचे आहे.
- डाॅ. निखिल डाेकरीमारे, 
अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक

लसीची गुणवत्ता पातळी वाढण्यासाठी लस घेतल्यानंतर मद्यप्राशन टाळले पाहिजे. कमीत कमी पंधरा दिवस तरी लस घेतल्यानंतर मद्यप्राशन करु नये. तसेही मद्यप्राशन कायमस्वरुपीच बंद करणे आराेग्याच्या दृष्टीने हिताचे आहे.
- डाॅ. याेगेश जिभकाटे, 
नेत्रराेग तज्ज्ञ भंडारा

 

Web Title: Alcohol should be avoided for a few days after vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.