शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
3
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
4
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
5
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
6
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
7
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
8
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
9
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
10
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
11
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
12
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
13
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
14
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
15
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
16
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
17
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
18
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
19
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
20
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विभाग म्हणतो, आठ हजार हेक्टरवरच नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 06:00 IST

भंडारा जिल्ह्यात दिवाळीच्या पर्वात परतीचा पाऊस झाला. संपूर्ण धान पीक आडवे झाले. कापणी झालेले कडपे ओले होऊन लोंब्यांना अंकुर फुटले आहे. शासनाने नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले असले तरी पंचनाम्यासाठी बहुतांश गावात कर्मचारी पोहोचले नाही. दरम्यान कृषी विभागाने ३० ऑक्टोबर रोजी प्राथमिक नजर अंदाज अहवाल शासनाला सादर केला.

ठळक मुद्देप्राथमिक अहवाल : परतीच्या पावसाचा जिल्हाभर फटका

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात दिवाळीच्या पर्वात परतीच्या पावसाने धान पिकाचे प्रचंड नुकसान झाले असले तरी कृषी विभागाने सादर केलेल्या प्राथमिक अहवालात केवळ आठ हजार ८० हेक्टरवरच नुकसान झाल्याचे म्हटले आहे. जिल्ह्यातील अनेक शेतात पंचनाम्यासाठी कर्मचारीच पोहोचले नाही. तातडीने पंचनामे करुन शेतकऱ्यांना दिलासा देणे अपेक्षित कोणत्याही हालचाली दिसत नाही. त्यामुळे विम्याचा लाभ मिळणार की नाही? अशी शंका निर्माण झाली आहे.भंडारा जिल्ह्यात दिवाळीच्या पर्वात परतीचा पाऊस झाला. संपूर्ण धान पीक आडवे झाले. कापणी झालेले कडपे ओले होऊन लोंब्यांना अंकुर फुटले आहे. शासनाने नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले असले तरी पंचनाम्यासाठी बहुतांश गावात कर्मचारी पोहोचले नाही. दरम्यान कृषी विभागाने ३० ऑक्टोबर रोजी प्राथमिक नजर अंदाज अहवाल शासनाला सादर केला. त्यात जिल्ह्यातील सात तालुक्यात आठ हजार ८० हेक्टर नुकसान झाल्याचे म्हटले आहे.प्रत्यक्षात जिल्ह्यात प्रचंड नुकसान झाले असताना २४ ते ३० ऑक्टोबर या कालावधित पावसामुळे नुकसान झाल्याचा अहवाल सादर केला. त्यात जिल्ह्यात बाधित गावांची संख्या ४५४ नमूद करण्यात आली आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात एक लाख ९१ हजार २४१ हेक्टरवर भाताची लागवड करण्यात आली होती. त्यापैकी आठ हजार ८० हेक्टरचे नुकसान झाले असून ३३ टक्क्यांच्या आत १९८१ हेक्टर आणि ३३ टक्क्यांच वर ६०९९ हेक्टर असल्याचेही या अहवालात म्हटले आहे.खरीपाचा सुरुवातीला पावसाने दगा दिल्याने शेतकरी चिंतेत होते. नंतरच्या कालावधीत पावसाने सरासरी गाठल्याने धान पिकाला जीवदान मिळाले. कमी कालावधीचा साधारण धान दिवाळीपुर्वी कापणीला आला. शेतकऱ्यांनी कापणीतून पुंजणे तयार केले.कडपा वाळण्यासाठी साधारण आठ दिवसाचा कालावधी लागतो. याच सुमारास परतीचा पाऊस झाल्याने कडपा भिजल्या. शेतात पाणी साचले.ढगाळ वातावरणामुळे कडपा ओल्या राहून त्याला अंकुर फुटले. पावसामुळे अनेक ठिकाणचे धान काळे पडले असून बाजारात त्याला कवडीची किंमत नाही.

टॅग्स :agricultureशेती