तांत्रिक बिघाडानंतरही बसगाडी खेळाडूंना घेऊन झाली रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 06:00 AM2019-09-22T06:00:00+5:302019-09-22T06:00:41+5:30

भंडारा येथे बस पोहचल्यावर खेळाडू व संघ व्यवस्थापक एस.आर. खोब्रागडे यांनी चालक व वाहकाचे कौतुक करण्यात आले. प्रवाशांच्या सोयीसाठी ब्रीदवाक्याचा प्रत्यय तुमसर आगार प्रमुख रामचौरे यांच्या निर्णयामुळे खेळाडूंना आला. सध्या तुमसर आगारात बसगाड्यांची कमतरता आहे. त्यामुळे प्रवाशी व विद्यार्थ्यांना उशीरा गंतव्य स्थानावर पोहचावे लागत आहे.

After the technical breakdown, the bus driver left with the players | तांत्रिक बिघाडानंतरही बसगाडी खेळाडूंना घेऊन झाली रवाना

तांत्रिक बिघाडानंतरही बसगाडी खेळाडूंना घेऊन झाली रवाना

Next
ठळक मुद्देसंडे अँकर । आगार प्रमुखांच्या निर्णयाने खेळाडू पोहचले वेळेवर, खेळाडूंनी मानले आगार प्रमुखांचे आभार

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रीदवाक्य एसटी महामंडळाचे आहे. परंतु शुक्रवारी तुमसर आगारात शालेय खेळाडूंच्या सेवेसाठी या ब्रीदवाक्याचा परिचय आला. सकाळी ९.३० च्या सुमारास भंडाराकडे जाणाऱ्या बसगाड्या नव्हत्या. खेळाडूंना तात्काळ भंडाराकडे जायचे होते. आगार प्रमुखांनी बसगाडीला जोखीम पत्करून भंडारा येथे खेळाडूंना घेऊन रवाना केली.
शुक्रवारी भंडारा येथे जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा होती. तुमसर येथून १४, १७ व १९ वर्षीय मुलींचा संघ तुमसर बसस्थानकावरून भंडारा येथे जाण्यास आला. बसस्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी होती.
सकाळी ९.३० च्या सुमारास भंडारा येथे जाण्यास बसगाडी उपलब्ध नव्हती. वेळ निघून जात होती. दरम्यान संघ व्यवस्थापकांनी आगार प्रमुख युधिष्ठीर रामचौरे यांचेशी संपर्क साधला.
आगार प्रमुख रामचौरे तात्काळ कार्यालयातून बसस्थानकात दाखल झाले.
त्यांनी तिरोडा-यवतमाळ येथे जाणारी बस काही तांत्रिक बिघाडाने बसस्थानकावर उभी होती. वाहक प्रशांत साठवणे व चालक पंकज पटले यांचेशी चर्चा केली. चालक व वाहकांनी भंडारा येथे जाण्यास होकार दिला.
भंडारा येथे जाण्यापूर्वी आगार व्यवस्थापक रामचौरे यांनी तांत्रिक बिघाडाची माहिती संघ व्यवस्थापकांना दिली होती. इतर प्रवाशांनाही माहिती दिल्यावर त्यांनी प्रथम खेळाडूंना घेऊन जा असा समंजसपणा दाखविला.
भंडारा येथे बस पोहचल्यावर खेळाडू व संघ व्यवस्थापक एस.आर. खोब्रागडे यांनी चालक व वाहकाचे कौतुक करण्यात आले.
प्रवाशांच्या सोयीसाठी ब्रीदवाक्याचा प्रत्यय तुमसर आगार प्रमुख रामचौरे यांच्या निर्णयामुळे खेळाडूंना आला. सध्या तुमसर आगारात बसगाड्यांची कमतरता आहे. त्यामुळे प्रवाशी व विद्यार्थ्यांना उशीरा गंतव्य स्थानावर पोहचावे लागत आहे. शासनाने सदर समस्या दूर करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.

Web Title: After the technical breakdown, the bus driver left with the players

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.