शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

अपघातानंतर पालिकेला आली जाग

By admin | Updated: June 5, 2016 00:24 IST

सार्वजनिक शौचालयाची इमारत भुईसपाट केल्यावर खड्डा बुजविण्यात आला नाही.

तुमसर : सार्वजनिक शौचालयाची इमारत भुईसपाट केल्यावर खड्डा बुजविण्यात आला नाही. या खड्यात एक गर्भवती गाय पडली. तीन तासानंतर पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यंत्राच्या सहाय्याने तिला सुखरुप बाहेर काढण्यत आले. शहरातील बजाज नगरात जुने सार्वजनिक शौचालय होते. ते शौचालय पालिकेने भूईसपाट केले. परंतु शौचालयाचा खड्डा बुजविला नाही. चार महिन्यापूर्वी पालिकेने ही कारवाई केली होती. गुरुवारी दुपारी एक गर्भवती गाय चाऱ्याकरिता येथे भटकत आली. खड्याच्या बाजूला मलबा होता. मलबा घसरून ती सरळ खड्यात पडली. खड्यात पाणी होते. खड्याचे तोंड निमुळते होते. त्यामुळे ती उभी होऊ शकत नव्हती. शेवटी जीव गुदमरण्याचा प्रसंग तिच्यावर ओढावला. परिसरातील तीन ते चार युवकांनी एक दोरखंड बांधून गायीला वर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु गायीचे वजन जास्त व खड्याचे तोंड निमुळते असल्याने त्यांना यश आले नाही. घटनास्थळी भेट देऊन थेट नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे व पालिका मुख्याधिकारी चंद्रशेखर गुल्हाणे यांचेशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून माहिती दिली. मुख्याधिकारी चंद्रशेखर गुल्हाणे व कर्मचारी घटनास्थळी यंत्र साहित्यासह आले. त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून गायीला खड्यातून बाहेर काढले. एका गायीला येथे जीवदान भेटले. भूईसपाट शौचालयाजवळील दोन खड्डेही कर्मचाऱ्यांनी बुजविले. (तालुका प्रतिनिधी)