शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

भेसळयुक्त खाद्य तेल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 05:00 IST

भंडारा तालुक्यातील ठाणा पेट्रोलपंप येथील ताज किराणा स्टोअर्समध्ये रिफाईन्ड सोयाबिन तेलाची विक्री करण्यात येत होती. यात १५ किलोचे एकूण ११ टीन विक्रीसाठी साठविण्यात आले होते. सदर खाद्य तेलाबाबत अन्न सुरक्षा अधिकारी बी.जी. नंदनवार यांनी चौकशी केली असता तेलपिप्याचे खरेदीचे बिल आढळून आले नाही.

ठळक मुद्देठाणा येथे कारवाई : अन्न व औषधी प्रशासनाची धाड

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणात खाद्य तेलाची विक्री वाढत असते. याचाच फायदा घेवून कमी दर्जाचे व भेसळयुक्त खाद्य तेलाची विक्री होत असते. अशाच गोपनीय माहितीच्या आधारे अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी ठाणा पेट्रोलपंप येथे एका पेढीवर कारवाई करीत ११ टीन खाद्य तेलाचे पीपे जप्त केले.
भंडारा तालुक्यातील ठाणा पेट्रोलपंप येथील ताज किराणा स्टोअर्समध्ये रिफाईन्ड सोयाबिन तेलाची विक्री करण्यात येत होती. यात १५ किलोचे एकूण ११ टीन विक्रीसाठी साठविण्यात आले होते. सदर खाद्य तेलाबाबत अन्न सुरक्षा अधिकारी बी.जी. नंदनवार यांनी चौकशी केली असता तेलपिप्याचे खरेदीचे बिल आढळून आले नाही. सदर खाद्य तेलाची पॅकिंग गडेगाव येथील असून ते तेल कमी दर्जाचे असल्याचा संशय अधिकाऱ्यांना आला. सदर पीपे जप्त करून तेल तपासणीसाठी नमूने घेण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या तेलाच्या साठ्याची किंमत १४ हजार १६१ रूपये सांगण्यात येते.
सदर कारवाई अन्न व औषध सहआयुक्त चंद्रकांत पवार यांच्या मार्गदर्शनात सहायक उपायुक्त जयंत वाणे यांच्या नेतृत्वात अन्न सुरक्षा अधिकारी भाष्कर नंदनवार यांनी केले. जिल्ह्यात सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणात अन्न पदार्थांमध्ये भेसळ करुन विकली जातात. याबाबत ग्राहकांनीही जागरुक राहून खरेदी केली पाहिजे असे अन्न व औषध प्रशासनाने कळविले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी