शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन होणार

By admin | Updated: August 17, 2016 00:14 IST

राज्यातील खासगी संस्थांमधील अनुदानित पदावर कार्यरत प्राथमिक व माध्यमिक शाळांतील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन

शिक्षण आयुक्तांचे परिपत्रक : खासगी संस्थांच्या अनुदानित शिक्षकांना सामावणार अशोक पारधी पवनी राज्यातील खासगी संस्थांमधील अनुदानित पदावर कार्यरत प्राथमिक व माध्यमिक शाळांतील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याच्या सूचना शासनाने यापूर्वी दिलेल्या आहेत. त्यानुसार शिक्षण आयुक्त यांचे परिपत्रकानुसार अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन तीन फेऱ्यात पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे गेल्या शैक्षणिक सत्रापासून सुरु असलेल्या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. खासगी संस्थांकडून संस्थेकडे अनुदानित पदावर अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांची तसेच संस्थेमधील रिक्त पदांची माहिती शासनाच्या संकेतस्थळावर भरण्याची कार्यवाही सुरु आहे. त्यासाठी आवश्यक सूचना शिक्षण आयुक्त यांचे ११ आॅगस्टचे पत्रान्वये निर्गमित करण्यात आलेले आहेत. त्यानंतरच जिल्ह्यातील सर्व अतिरिक्त शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी, जिल्ह्यातील रिक्त पदांनुसार त्या संस्थेचे अनुशेष तपशील व जिल्ह्यातील विषयनिहाय रिक्त पदांची यादी शिक्षणाधिकारी यांचे लॉगिंगला जनरेट होणार आहे. ही यादी प्रसिद्ध करून अतिरिक्त शिक्षकांना त्याची कल्पना द्यावयाची आहे. हरकती, सूचनांसाठी चार दिवसांचा कालावधी दिल्यानंतर अतिरिक्त शिक्षक व रिक्त पदांची यादी अंतिम समजण्यात येईल. त्यानंतर यादीमध्ये कोणताही बदल करता येणार नाही. यानंतर समायोजनाचे दिवशी जिल्ह्यातील सर्व अतिरिक्त शिक्षक व त्यांचे मुख्याध्यापक, रिक्त पदे असणाऱ्या शाळेचे मुख्याध्यापक या सर्वांना उपस्थित राहण्याच्या सूचना द्यावयाच्या आहेत. शासनाने अतिरिक्त शिक्षकांच्या आॅनलाईन समायोजनाची कार्यपद्धती निश्चित करून दिलेली आहे. त्यामुळे समायोजन तीन फेऱ्यांमध्ये पूर्ण करावयाचे आहे. समायोजनाचे पहिल्या फेरीत जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांची त्यांच्या सध्याच्या पदावरील प्रथम नियुक्ती दिनांकापासून सेवाज्येष्ठता यादी तयार होईल. यादीनुसार अतिरिक्त शिक्षकांचा प्रवर्ग व अध्यापनाचा विषय या दोन्ही बाबीनुसार जिल्ह्यातील ज्या संस्थेत सदर प्रवर्गाचा अनुशेष शिल्लक आहे व त्या संस्थेत त्या विषयाची जागा रिक्त असल्यास सदर शाळेची यादी उपलब्ध होईल. संबंधित शिक्षकांनी त्यांच्या सोयीनुसार व पसंतीने शाळा निवडावी. शाळा निवडल्यानंतर सदर शिक्षकाचे समायोजन त्या शाळेत होऊन समायोजनाच्या आदेशाची प्रत आॅनलाईन जनरेट होईल. त्यानंतर त्यामध्ये बदल करता येणार नाही. जिल्ह्यामध्ये त्याच्या प्रवर्गानुसार विषयाची जागा उपलब्ध नसल्यास सदर शिक्षक पुढील फेरीसाठी पाठविण्यात येईल. ज्या अतिरिक्त शिक्षकांचे प्रथम फेरीत समायोजन होऊ शकणार नाही अशा शिक्षकांना त्यांच्या अध्यापनाच्या विषयानुसार सर्वसाधारण प्रवर्गातील रिक्त पदानुसार रिक्त जागांची यादी उपलब्ध होईल. संबंधित शिक्षकाने त्याच्या सोयीनुसार व आवडीनुसार पसंतीने शाळा निवडावी. समायोजनाच्या आदेशाची प्रत आॅनलाईन जनरेट होईल. त्यानंतर बदल करता येणार नाही. शिक्षकांसाठी जिल्ह्यामध्ये त्याच्या विषयाची जागा उपलब्ध नसल्यास सदर शिक्षक पुढील फेरीसाठी पाठविण्यात येईल. अशा शिक्षकांना त्याच्या प्रवर्गाचा विचार न करता अध्यापनाच्या विषयानुसार त्यांच्या सोयीनुसार व पसंतीने शाळा निवडावी. समायोजनाचे आदेशाची प्रत प्राप्त होईल. त्यामध्ये बदल होणार नाही. सदर शिक्षकासाठी जिल्ह्यामध्ये त्याच्या विषयाची जागा उपलब्ध नसल्यास सदर शिक्षकाचे नाव विभागस्तरावर शिक्षण उपसंचालक यांच्याकडे समायोजनासाठी पाठविण्यात येणार आहे. १६ आॅगस्टपासून सुरु होणारी प्रक्रिया समायोजनाने २५ आॅगस्ट रोजी पूर्ण होणार आहे.