शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
2
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
4
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
5
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
6
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
8
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
9
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
10
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
11
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
12
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
13
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
14
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
15
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
16
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
17
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
18
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
19
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
20
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका

भंडारा तालुक्यात दोन कृषी केंद्रांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2020 5:00 AM

तालुक्यातील शहापूर येथील बाबा ताज मेहंदी कृषी केंद्र व पहेला येथील सहकार कृषी केंद्रावर भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले व तंत्र अधिकारी शांतीलाल गायधने यांनी ही कारवाई केली. खरीप हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार व उत्तम प्रतीचे बियाणे उपलब्ध व्हावे, शेतकऱ्याची कुठेही फवणूक होवू नये यासाठी कृषी विभागाच्यावतीने कृषी सेवा केंद्रांची तपासणी करण्यात येत आहे.

ठळक मुद्देविक्रीबंदचे आदेश : बांधावर खते, बियाणे पोहचविण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांच्या बांधावर खते, बियाणे पोहचविण्यात येत आहे. मात्र शासनाच्या या आदेशाचे उल्लंघन करणाºया तसेच बिल बुक, वजनकाटा, पॉस मशीनवरील व स्टॉकबुकवरील रासायनिक खतांचा हिशोब न जोडणे या कारणावरून भंडारा तालुक्यातील दोन कृषी केंद्रांवर कृषी विभागाच्यावतीने कारवाई करण्यात आली.तालुक्यातील शहापूर येथील बाबा ताज मेहंदी कृषी केंद्र व पहेला येथील सहकार कृषी केंद्रावर भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले व तंत्र अधिकारी शांतीलाल गायधने यांनी ही कारवाई केली. खरीप हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार व उत्तम प्रतीचे बियाणे उपलब्ध व्हावे, शेतकऱ्याची कुठेही फवणूक होवू नये यासाठी कृषी विभागाच्यावतीने कृषी सेवा केंद्रांची तपासणी करण्यात येत आहे.उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड यांच्या मार्गदर्शनात खते, बियाण्यांचा साठा करून ठेवणारा तसेच शेतकऱ्यांना बी-बियाणे बांधावर पोहचविण्यात टाळाटाळ करणाऱ्या कृषी केंद्रांना अधिकाऱ्यांनी कानउघडणी केली. कोरोना पार्श्वभूमीवर कुठेही गर्दी होणार नाही यासाठी कृषी विभागाच्यावतीने खरीप हंगामाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यादृष्टीने कृषी सेवा केंद्र चालकांना कृषी विभागाच्या समन्वयातून योग्य ते नियोजन करावे याबाबतच्या सूचना पाहणीदरम्यान तालुका कृषी अधिकारी कोटांगले यांनी दिल्या. तालुक्यातील विविध गावातील कृषी केंद्रांना भेटी देत शेतकऱ्यांना करण्यात येत असलेल्या कृषी निविष्ठांचा यावेळी आढावा घेण्यात आला. त्याचवेळी शेतकºयांची कुठेही फसवणूक होणार नाही अथवा तक्रार येणार नाही यासाठी कृषी केंद्र चालकांनी सकारात्मक भूमिका निभावण्याचे आवाहन करण्यात आले.शासनाच्या निर्देशानुसार सर्व कृषी केंद्र चालकांनी शेतकऱ्यांना बांधावर खते पोहचविणे आवश्यक आहे. शेतकºयांची कुठेही फसवणूक होणार नाही यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्या.-अविनाश कोटांगले, तालुका कृषी अधिकारी भंडारा.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्र